कोविड रुग्णालयातून सावद्याला पळून आलेला पॉझिटीव्ह पुन्हा रुग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 05:47 PM2020-05-24T17:47:50+5:302020-05-24T17:49:43+5:30

कोरोना पॉझिटीव्ह म्हणून आढळलेल्या व्यक्तीला जळगावच्या कोविड रुग्णालयात उपचारासाठी पाठविले होते. तो तेथून पळून दोन दिवस शहरात मुक्कामी असल्याने रविवारी सकाळी त्याला पुन्हा रुग्णालयात नेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Positive, who escaped from Kovid Hospital, is back in the hospital | कोविड रुग्णालयातून सावद्याला पळून आलेला पॉझिटीव्ह पुन्हा रुग्णालयात

कोविड रुग्णालयातून सावद्याला पळून आलेला पॉझिटीव्ह पुन्हा रुग्णालयात

googlenewsNext
ठळक मुद्देरुग्ण पळाल्यानंतर आरोग्य यंत्रणा धास्तावली होती चौघांना केले क्वॉरंटाईन

सावदा, ता.रावेर, जि.जळगाव : काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटीव्ह म्हणून आढळलेल्या व्यक्तीला जळगावच्या कोविड रुग्णालयात उपचारासाठी पाठविले होते. तो तेथून पळून दोन दिवस शहरात मुक्कामी असल्याने रविवारी सकाळी त्याला पुन्हा रुग्णालयात नेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
काही दिवसांपूर्वी शहरातील एक रहिवासी कोरोना पॉझिटिव्ह म्हणून आढळला होता. हा व्यक्ती मुंबईहून सावदा येथे आला होता. पॉझिटिव्ह निष्पन्न झाल्यानंतर त्याला जळगावी कोविड रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असतानाच तो रुग्णालयातून पळून साळीबाग जवळच्या परिसरात आपल्या घरी पळून आला होता. येथे त्याने दोन दिवस मुक्काम ठोकला होता. दुसरीकडे पॉझिटिव्ह रुग्णाने पलायन केल्याने धास्तावलेल्या आरोग्य यंत्रणेन त्याचा माग काढला. या अनुषंगाने रविवारी पहाटे पाचला या व्यक्तीला रुग्णवाहिकेतून पुन्हा कोविड रुग्णालयात नेण्यात आले.
दरम्यान, शहरात दोन दिवस कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाने मुक्काम ठोकल्याचे उघडकीस आल्यानंतर स्थानिक प्रशासनाने तत्काळ त्याच्या रहिवासाच्या ठिकाणी धाव घेतली. आज सकाळपासून या भागात फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे, तर या रुग्णाच्या संपर्कात असलेल्या चौघांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. मुख्याधिकारी जोशी यांच्यासह पोलीस प्रशासन परिस्थितीवर नजर ठेवून आहेत.

Web Title: Positive, who escaped from Kovid Hospital, is back in the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.