पॉझिटिव्हिटी आणखी घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:11 AM2021-06-30T04:11:15+5:302021-06-30T04:11:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पॉझिटिव्हिटी काढण्यासाठी आता केवळ आरटीपीसीआर अहवालांमधील बाधितच ग्राह्य धरले जाणार असून या नवीन निकषानुसार ...

Positivity fell further | पॉझिटिव्हिटी आणखी घसरली

पॉझिटिव्हिटी आणखी घसरली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : पॉझिटिव्हिटी काढण्यासाठी आता केवळ आरटीपीसीआर अहवालांमधील बाधितच ग्राह्य धरले जाणार असून या नवीन निकषानुसार गेल्या आठवडाभरात जिल्ह्याची पॉझिटिव्हिटी ही ०.८ टक्क्यांवरून घसरून ०.४ टक्क्यांवर आली आहे. गेल्या आठवडाभरात आरटीपीसीआरचे १६ हजार ५४ अहवाल समोर आले आहेत. यात ७२ जण बाधित आढळून आले आहेत.

जिल्ह्यात एकत्रित आरटीपीसीआर चाचण्या या ४ लाख २५ हजार ६९५ झालेल्या असून त्यांमध्ये ५७ हजार ६९४ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. हे प्रमाण १३.५५ टक्क्यांवर जाते. याचा अर्थ एकत्रित जिल्ह्याचा विचार केला असता १३. ५५ टक्के लोकांमध्ये संसर्गाचे प्रमाण आहे. असा अंदाज यावरून काढता येतो. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच आरोग्य विभागाकडून आता पॉझिटिव्हिटी अर्थात बाधितांचे प्रमाण काढण्यासाठी केवळ आरटीपीसीआर अहवालच ग्राह्य धरले जातील, ॲन्टीजनमधील बाधित यात पकडू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हाचा हा दर आणखी कमी झाला आहे. १५ जून ते २२ जून दरम्यान जिल्ह्याचा हा दर ०.८ टक्के होता. यात सर्वात कमी दर असलेल्या जिल्ह्यांमध्ये राज्यात जळगाव दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला होता. हे सकारात्मक चित्र असताना डेल्टा प्लसमुळे सर्वत्र निर्बंध कडक करण्यात आले आहेत.

१०० नमुने पाठविले

आता दर महिन्याला बाधितांमधून काही नमुने निवडून दिल्ली येथे जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठविण्यात येणार असून जूनचे हे अहवाल पाठविण्यात आले आहेत. यांचा अहवाल हा पुढील महिन्यात अपेक्षित आहेत.

दैनंदिन स्थिती अशी

२१ जून : आरटीपीसीआर : २३४४, बाधित १३, पॉझिटिव्हिटी : ०. ५५ टक्के

२२ जून : आरटीपीसीआर : ११२९, बाधित ३, पॉझिटिव्हिटी : ०.२६ टक्के

२३ जून : आरटीपीसीआर : २२८८, बाधित ९, पॉझिटिव्हिटी : ०.३९ टक्के

२४ जून : आरटीपीसीआर : १८००, बाधित ६, पॉझिटिव्हिटी : ०.३३ टक्के

२५जून : आरटीपीसीआर : २७१५, बाधित १६, पॉझिटिव्हिटी : ०.५८ टक्के

२६ जून : आरटीपीसीआर : १५८३, बाधित १०, पॉझिटिव्हिटी : ०.६३ टक्के

२७ जून : आरटीपीसीआर : २१२५, बाधित ८, पॉझिटिव्हिटी : ०.३७ टक्के

२८ जून : आरटीपीसीआर : २०७०, बाधित ७, पॉझिटिव्हिटी : ०.३३ टक्के

Web Title: Positivity fell further

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.