जळगाव जिल्ह्याची पॉझिटिव्हिटी २ टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:13 AM2021-05-31T04:13:53+5:302021-05-31T04:13:53+5:30
कोरोनाचे रुग्ण घटले : आरोग्य विभागाकडून अहवाल जाहीर लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : २२ ते २९ मे दरम्यान जिल्ह्यातील ...
कोरोनाचे रुग्ण घटले : आरोग्य विभागाकडून अहवाल जाहीर
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : २२ ते २९ मे दरम्यान जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी ही २ टक्के राहिली आहे, अशी माहिती शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. यात सर्व जिल्ह्यांची माहिती देण्यात आली आहे. मात्र, प्रशासनाकडून नियमित येणाऱ्या अहवालांमधील आकडेवारी व शासनाकडून जाहीर झालेल्या आकडेवारीत तफावत समोर आली आहे.
शासनाकडून आलेल्या माहितीनुसार या आठवडाभरात जिल्हाभरात ५४०२३ चाचण्या झाल्या असून त्यात १०८२ बाधित आढळून आले आहेत. हे प्रमाण २ टक्के असून विशेष बाब म्हणजे राज्यात हे सर्वात कमी प्रमाण आहे. मात्र, प्रशासकीय आकडेवारीनुसार आठवडाभरात ५९८३५ चाचण्या झाल्या असून १७१५ बाधित आढळून आले आहेत. हे प्रमाण २.८६ टक्के आहे.