आरटीपीसीआरची पॉझिटिव्हिटी ४८ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:14 AM2021-03-24T04:14:57+5:302021-03-24T04:14:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जळगाव शहरातील कोरोनाचा संसर्ग थांबण्याची चिन्हेच नसून मंगळवारी २५६ नवे कोरेाना बाधित आढळून आले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव शहरातील कोरोनाचा संसर्ग थांबण्याची चिन्हेच नसून मंगळवारी २५६ नवे कोरेाना बाधित आढळून आले आहेत. गंभीर बाब म्हणजे पुन्हा तीन बाधितांचा मृत्यू झाला असून गेल्या दोन दिवसात ८ बाधितांच्या मृत्यूची नोंद जळगाव शहरात झाली आहे. दरम्यान, मंगळवारी जिल्ह्यातील आरटीपीसीआर अहवालांमध्ये तब्बल ४८ टक्के लोक बाधित आढळून आले आहे. हे प्रमाण सर्वात जास्त मानले जात आहे.
मंगळवारी ५४४३ ॲन्टीजन चाचण्या करण्यात आल्या. तर आरटीपीसीआरचे ७७० अहवाल समोर आले. यात तब्बल ३७५ बाधित आढळून आले असून हे प्रमाण ४८. ७० टक्के आहे. याचा अर्थ प्रत्येक शंभर तपासण्यांमध्ये ४८ रुग्ण बाधित आहेत. यावरून संसर्गाचा फैलाव किती झाला आहे. याचा अंदाजही काढला जातो. गेल्या दीड महिन्यात जिल्ह्यात प्रचंड संसर्ग वाढला असून जळगाव शहर यात हॉटस्पॅाट ठरले आहे. शहरात सोमवारी तर ४४४ बाधितांची नोंद करण्यात आली होती.
दोन दिवसात मृत्यू वाढले
गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात २३ बाधितांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी जळगाव शहर ३, भुसावळ तालुका ३, पाचोरा २, अमळनेर, बोदवड, धरणगाव, यावल या तालुक्यात प्रत्येकी १ बाधिताचा मृत्यू झाला आहे. दरम्यान यात सहा रुग्ण हे ६० वर्षापेक्षा कमी वयाचे असून भुसावळ तालुक्यातील एका ४८ वर्षीय महिला रुग्णाचा मृतांमध्ये समावेश आहे.
जिल्ह्यात दोन दिवसात
२१८३ रुग्ण
शहरात दोन दिवसात
७०० रुग्ण
पिंप्राळाच हॉटस्पॉट
शहरातील सर्वच भागात कमी अधिक प्रामणात रुग्ण समोर येत आहे. यात पिंप्राळा व खोटेनगर, महाबळ, मुक्ताईनगर अशा काही भागांमध्ये सातत्याने अधिक रुग्ण आढळून येत आहेत. यात पिंप्राळ्या ११ नव्या बाधितांची नोंद करण्यात आली. शहरातील हे काही हॉटस्पॉट कायम आहेत.