वाकलेली झाडे व फांद्यामुळे अपघाताची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:19 AM2021-08-29T04:19:08+5:302021-08-29T04:19:08+5:30
पावसाळ्यापूर्वी महावितरणतर्फे फक्त महावितरणच्या विद्युत वाहिन्यांना अडथळा ठरणारी झाडे अथवा फांद्याच हटविल्या जातात. इतर ठिकाणची वाकलेली झाडे किंवा फांद्या ...
पावसाळ्यापूर्वी महावितरणतर्फे फक्त महावितरणच्या विद्युत वाहिन्यांना अडथळा ठरणारी झाडे अथवा फांद्याच हटविल्या जातात. इतर ठिकाणची वाकलेली झाडे किंवा फांद्या तशाच राहतात. महापालिकेकडूनही या तोडल्या जात नाहीत. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला वाऱ्यामुळे झाडे कोसळण्याच्या घटना घडत आहेत. यंदा तर दोन ते अडीच महिन्यांच्या पावसाच्या कालावधीत शहरात अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या असून, आताही अनेक ठिकाणच्या रस्त्यांवर पावसामुळे वाकलेली झाडे दिसून येत आहेत.
यामध्ये जिल्हा क्रीडा संकुलाकडून कोर्ट चौकाकडे जाणारा रस्ता, नेहरू चौकातून स्टेशनकडे जाणारा रस्ता, तसेच दोन दिवसांपूर्वी आकाशवाणी चौकाकडून काव्यरत्नावली चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरही पुन्हा दोन ठिकाणी वाकलेली झाडे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्यामुळे ही झाडेदेखील वाऱ्यामुळे कोसळण्याची शक्यता असून, मनपा प्रशासनाने तातडीने ही झाडे तोडण्याची मागणी वाहनधारकांमधून केली जात आहे.