महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता; जयंत पाटलांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 04:42 PM2023-03-28T16:42:14+5:302023-03-28T16:44:09+5:30

सध्याचे सरकार हे निवडणुकांना घाबरत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थासह सर्व निवडणुका जास्तीत जास्त पुढे कशा ढकलता येतील,  याचाच प्रयत्न सुरू आहे. असे पाटील म्हणाले.

Possibility of President's rule in Maharashtra; Statement by NCP Jayant Patil on Eknath shinde fadanvis election politics | महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता; जयंत पाटलांचे वक्तव्य

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता; जयंत पाटलांचे वक्तव्य

googlenewsNext

महेश कौंडिण्य

पाचोरा, जि.जळगाव :  सुप्रीम कोर्टाचा योग्य निकाल आल्यास राज्य सरकार कोसळू शकते, परंतु मध्यावधी निवडणुकाऐवजी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता अधिक आहे,  असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंगळवारी पाचोरा येथे पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.

सध्याचे सरकार हे निवडणुकांना घाबरत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थासह सर्व निवडणुका जास्तीत जास्त पुढे कशा ढकलता येतील,  याचाच प्रयत्न सुरू आहे.  बाजार समितीच्या निवडणुका पक्ष म्हणून लढवल्या जात नाही,  तर कार्यकर्ता ती निवडणूक लढत असतो आणि इतर निवडणुकीमध्ये मात्र सर्वांना सोबत घेऊन निवडणुका लढाव्यात ही राष्ट्रवादीची भूमिका आहे. असे असले तरी परिस्थितीनुरूप स्थानिक जिल्हाध्यक्ष आणि नेत्यांना त्या संदर्भातील अधिकार देण्यात आल्याचे  त्यांनी सांगितले. 

जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावे, म्हणून  भाजपकडून धार्मिक भावना भडकवण्याचे काम सुरू आहे.  तर देशात कुठल्या घोषणा दिल्या जातील किंवा कोणी काय बोलावे, याचा देखील निर्णय कोर्टच द्यायला लागलं असल्यामुळे आता बोलण्याचीदेखील सोय राहिली नाही, अशा मार्मिक टीका  त्यांनी शिंदे भाजप सरकारवर  केली.

 पाचोरा येथे माजी आमदार दिलीप वाघ यांच्या निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी आमदार वाघ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Possibility of President's rule in Maharashtra; Statement by NCP Jayant Patil on Eknath shinde fadanvis election politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.