द्वितीय सत्राचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:12 AM2021-06-03T04:12:28+5:302021-06-03T04:12:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या द्वितीय सत्राच्या उन्हाळी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक कवयित्री बहिणाबाई चौधरी ...

Possible schedule of second session announced | द्वितीय सत्राचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

द्वितीय सत्राचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या द्वितीय सत्राच्या उन्हाळी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा प्रारंभ झाल्या आहेत, तर काही अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक विद्यापीठाकडून जाहीर करण्‍यात आलेले आहे. अशातच प्रथम वर्ष विज्ञान व एमएमस्सी वर्ग, तसेच कला, वाणिज्य व व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या पदवी व पदव्युत्तर वर्गाच्या प्रथम वर्षाच्या द्वितीय उन्हाळी लेखी व अंतर्गत, बहिस्थ प्रात्यक्षिक परीक्षा, प्रकल्प, मौखिक परीक्षा सुरू होण्याच्या संभाव्य विद्यापीठाकडून जाहीर करण्‍यात आलेल्या आहेत.

असे आहे वेळापत्रक

विज्ञान प्रथम वर्षाच्या द्वितीय सत्राची ८ ते २० जुलै कालावधीत होईल. १ ऑगस्ट ही लेखी परीक्षेची संभाव्य तारीख आहे. एमएसस्सी द्वितीय सत्राची प्रात्यक्षिक परीक्षा १० ते २० ऑगस्ट या कालावधीत होईल, तर २५ ऑगस्ट ही लेखी परीक्षेची संभाव्य तारीख असेल. प्रथम वर्ष पदवी व पदव्युत्तर कला, वाणिज्य व व्यवस्थान अभ्यासक्रमाची प्रात्यक्षिक परीक्षा ही महाविद्यालयांच्या निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार होईल; पण पदवी कला, वाणिज्य व व्यवस्थानची लेखी परीक्षा १ ऑगस्ट, तर पदव्युत्तरची २५ ऑगस्टपासून लेखी परीक्षा सुरू होण्याची संभाव्य तारीख जाहीर करण्‍यात आली आहे. त्याचबरोबर प्रथम वर्ष एमबीए सत्र २ ची लेखी परीक्षा १५ सप्टेंबर होईल.

Web Title: Possible schedule of second session announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.