जळगावात सापडल्या चलनातील बाद नोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 07:52 PM2018-08-18T19:52:33+5:302018-08-18T19:56:20+5:30

मोहाडी जवळील नागझिरी शिवारातील मुंबई-भुसावळ रेल्वेलाईनवर शुक्रवारी दुपारी चलनातून बाद झालेल्या पाचशे व हजार रूपयांच्या नोटा आढळून आल्याने चांगलीच खळबळ उडाली़

Post-currency notes in Jalgaon | जळगावात सापडल्या चलनातील बाद नोटा

जळगावात सापडल्या चलनातील बाद नोटा

googlenewsNext
ठळक मुद्देचलनातून बाद झालेल्या पाचशे, हजार रूपयांच्या नोटामुंबई-भुसावळ रेल्वे रुळावर पडून होत्या जुन्या नोटादापोरा येथील नागरिकांनी केली नोटा पाहण्यासाठी गर्दी

जळगाव/ दापोरा- मोहाडी जवळील नागझिरी शिवारातील मुंबई-भुसावळ रेल्वेलाईनवर शुक्रवारी दुपारी चलनातून बाद झालेल्या पाचशे व हजार रूपयांच्या नोटा आढळून आल्याने चांगलीच खळबळ उडाली़
शुक्रवारी दुपारी दापोरा, धानोरा तसेच मोहाडी, शिरसोली परिसरातील काही शेतकरी कामानिमित्त शेतात जात होते़ यावेळी नागझीरी शिवारातील मुंबई-भुसावळ रेल्वे लाईनवरील खांबा क्रमांक ४२५ जवळून शेतकरी जात असताना त्यांना चलनातून बाद झालेल्या ५०० व १००० रूपयांच्या नोटांचा एक लहानसा ढिगच दिसला़ यानंतर हे वृत्त वाऱ्यासारखे सर्वत्र पसरले. या भागातील लोकांनी या नोटा पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती़ दरम्यान, नोट बंदीला दोन वर्ष होऊन सुध्दा एवढी मोठी रक्कम कुणी साठवून ठेवली असेल यावर शेतकरी तर्क-वितर्क लावताना दिसून आले़
पाचशे व हजार रूपयांच्या नोटा सापडून आल्यानंतर मोहाडी रेल्वे पूल ते दापोरा तसेच शिरसोली रेल्वेस्टेशनपर्यंत रेल्वेरूळावर नोटांचे दोन तुकडे करून अज्ञातांनी फेकलेले आढळून आल्या़ फाटलेल्या नोटा उचलण्यासाठी लहान मुलांनी गर्दी केली होती़

Web Title: Post-currency notes in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.