डाकसेवकांच्या संपाने टपाल वितरण ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 05:35 PM2017-08-18T17:35:25+5:302017-08-18T17:37:14+5:30
ग्रामीण भागात नागरिकांना टपाल मिळत नसल्याने हाल होत आहेत.
ऑनलाईन लोकमत जामनेर (जि.जळगाव), दि. 18 : तालुक्यातील ग्रामीण भागातील डाक सेवक संपावर गेल्याने टपाल वितरण ठप्प झाले आहे. येथील मुख्य टपाल कार्यालयात ग्रामीण भागात पाठविले जाणारे टपालाचे गठ्ठे पडून आहेत. तालुक्यात नेरी, शेंदुर्णी, पहूर, वाकडी, फत्तेपूर व जामनेर असे उपविभाग असून, 41 शाखा कार्यालय आहेत. डाकसेवकांच्या संपामुळे या शाखा कार्यालयामार्फत वितरित होणारे टपाल वाटप न झाल्याने वितरण व्यवस्था कोलमडली आहे. ग्रामीण भागात अजूनही पोस्ट टपालाचे महत्त्व कायम असल्याने नागरिक आतुरतेने पोस्टमनची वाट पाहतात. डाकसेवकांच्या संपामुळे तीन दिवसांपासून टपाल वाटप बंद आहे. टपालाचे गठ्ठे पडून आहेत. शासनाने तातडीने निर्णय घेऊन संप मिटवावा. - ए.आर. साळुंके, सबपोस्टमास्तर, जामनेर