जळगाव जिल्हयातील टपाल कार्यालये पेपरलेस, 42 कार्यालयांमध्ये सी.एस.आय. प्रणाली सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 01:46 PM2018-01-24T13:46:57+5:302018-01-24T13:48:40+5:30
खासदार ए.टी पाटील यांच्याहस्ते उद्घाटन
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 24- जिल्ह्यातील टपाल खात्यातील सर्व 42 टपाल कार्यालयांमध्ये सुरू करण्यात आलेल्या सी. एस. आय. प्रणालीचे उद्घाटन मंगळवारी खासदार ए. टी. पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यामुळे सर्व टपाल कार्यालय पेपरलेस होणार आहे.
या वेळी डाक अधीक्षक बी.व्ही. चव्हाण, सहाय्यक डाक अधीक्षक पी.एस. मालकर, ए.जी. गायकवाड, ए.एस.गणोरे, पोस्टमास्तर एम. एन. पाटील, रमेश पवार, संतोष जलंकार व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
गतिमानतेसह पारदर्शकता येणार
सी. एस.आय. प्रणालीमुळे सर्व कर्मचा-यांची सेवा पुस्तके, रजा यांची माहिती यावर आली आहे. तसेच टपाल कार्यालयातील सर्व प्रकारच्या सेवा या प्रणाली मध्ये समाविष्ट आहे. यामुळे टपाल खात्याची सर्व कामे पेपरलेस होणार असून कामात गतिमानता येण्याबरोबरच सर्व सेवांमध्ये पारदर्शकता येणार आहे. याची सर्व माहिती पोस्टल ऑडीट, नागपूर या संस्थेला जोडली जाणार आहे. त्यामुळे या विभागाशी होणारा पत्रव्यवहार करण्यासाठी जाणारा वेळ वाचून सर्व प्रकारच्या कागदपत्रांची बचत होवून पोस्टाचा स्टेशनरीवर होणारा खर्चही वाचणार आहे.