चित्रकाराच्या उपासनेचे कुटुंबियांकडून मृत्यूपश्चात प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2017 07:08 PM2017-04-16T19:08:48+5:302017-04-16T19:08:48+5:30

गुलजार गवळी यांचे अनोखे स्मरण : जहांगिर आर्ट गॅलरीत प्रदर्शनासाठी 2010 मध्ये केली होती बुकींग

Posthumous display by the family of the artist of worship | चित्रकाराच्या उपासनेचे कुटुंबियांकडून मृत्यूपश्चात प्रदर्शन

चित्रकाराच्या उपासनेचे कुटुंबियांकडून मृत्यूपश्चात प्रदर्शन

Next

 ऑनलाईन लोकमत विशेष

जळगाव, दि.15- निसर्गाच्या सहवासात राहून नव अति वास्तववाद शोधत रंगांची दुनिया सजविणारे प्रसिद्ध चित्रकार व माजी प्राचार्य स्व.गुलजार गवळी यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या चित्राचे प्रदर्शन कुटुंबियांनी मुंबई येथील जहांगिर आर्ट गॅलरी येथे भरवित त्यांना अनोखी आदरांजली अर्पण केली आहे. प्रदर्शनातील मिनीएचर पेन्टींग, एरिअल इफेक्ट दाखविणा:या पेन्टींग कलारसिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
ये कोण चित्रकार है..
नंदुरबार जिल्ह्यातील भोरटेवाडा येथील मूळचे रहिवासी असलेले गुलजार गवळी यांनी 1970 च्या दशकात जे.जे.स्कूल ऑफ आर्टमध्ये आर्ट मास्टरचे शिक्षण घेतले. तत्पूर्वी 1969 मध्ये कोल्हापूर येथे डिप्लोमा इन ड्राईंग अॅण्ड पेंटीगचे शिक्षण त्यांनी घेतले. त्यानंतर खिरोदा येथील ललित कला भवनात साहाय्यक प्राध्यापक ते प्राचार्य म्हणून सेवा बजावली. 33 वर्षाच्या सेवेनंतर ते निवृत्त झाले होते. 10 ऑगस्ट 2014 रोजी त्यांचे चेन्नई येथे निधन झाले.
 
गवळी यांच्या चित्रात नवअति वास्तववादाचा प्रभाव
गुलजार गवळी यांनी ऑईल पेन्ट, वॉटर कलर व ट्रेम्प्रा कलरद्वारे चित्र साकारले. त्यांनी देशविदेशात 27 पेक्षा जास्त चित्रप्रदर्शन भरविले. त्यांच्या चित्रांवर नव अति वास्तववादाचा प्रभाव राहिला होता. या माध्यमातून त्यांनी निसर्गाकडे पाहण्याचा नवीन दृष्टीकोन आपल्या चित्रांमधून मांडला होता. आपल्या सेवाकाळात त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. काश्मीरमधील सौदर्याचे ऑन दी स्पॉट स्वरुपाचे 30 चित्र त्यांनी रेखाटले आहेत.
 
जहांगिर आर्ट गॅलरी मध्ये चित्र प्रदर्शनासाठी 10 वर्षापूर्वी बुकींग
कलेचे उपासक असलेल्या गुलजार गवळी यांनी आपल्या चित्राचे प्रदर्शन जहांगिर आर्ट गॅलरी मध्ये भरविण्याची इच्छा होती. मात्र तत्पूर्वी 2014 मध्येच त्यांचे निधन झाले. पतीची मृत्यूपूर्वी चित्र प्रदर्शनाची इच्छा त्यांच्या पत्नी अंजली गवळी यांनी कुटुंबात बोलून दाखविली. मुलांनी देखील वडिलांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवित त्यांना अनोखी श्रद्धांजली अर्पण करण्यास होकार दर्शविला. त्यानुसार 11 ते 17 एप्रिल दरम्यान गुलजार गवळी यांच्या निवडक 27 चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
 
फाईनलाईन आणि बोल्ड एरिअल इफेक्टला पसंती
गुलजार गवळी यांच्या चित्रप्रदर्शनाला प्रतिदिन 700 ते 900 चित्ररसिक भेट देत आहेत. औरंगाबाद येथील भडखल दरवाजा व बोल्ड एरिअल इफेक्ट असलेल्या मसजिदच्या पेन्टींगला रसिकांची पसंती मिळत आहे. यासोबत 1970 ते 80 च्या दशकातील माऊंटन पेन्टींग तसेच फाईन आर्ट ड्राईंगला देखील पसंती मिळत आहे.
 
चित्रप्रदर्शनासाठी कुटुंबिय हजर
11 एप्रिल रोजी प्रसिद्ध चित्रकार प्रभाकर कोलते यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी परेश मकवाणा, डॉ.किसन पाटील, व्ही.एस.चित्रे, कुंदन बाविस्कर यांच्यासह त्यांच्या पत्नी अंजली गवळी, कुटुंबातील सदस्य मनिषा गुप्ता, गितांजली व्यास, सुशील व्यास, भाविन गवळी, सारंग गवळी, वेदांत शाह, हिमालय शाह उपस्थित होते.

Web Title: Posthumous display by the family of the artist of worship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.