आदिवासी विभागांतर्गत इंग्रजी शाळांमधील प्रवेश योजनेस स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 08:24 PM2020-06-02T20:24:57+5:302020-06-02T20:25:11+5:30
जळगाव : आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरांतील नामांकीत इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळांमध्ये इयत्ता पहिली व दुसरीच्या वर्गात ...
जळगाव : आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरांतील नामांकीत इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळांमध्ये इयत्ता पहिली व दुसरीच्या वर्गात प्रवेश देण्यात येत असते. दरम्यान, यंदा सन २०२०-२०२१ या शैक्षणिक वषार्साठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शहरातील नामांकित शाळांमधील प्रवेशास स्थगिती देण्यात आली आहे.
काही महिन्यांपूर्वी पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांकडून अर्ज मागविण्यात आले होते़ मात्र, आता स्थगिती मिळाल्यामुळे ज्या पालकांनी आपल्या पाल्याचा शहरातील नामांकित शाळा प्रवेशासाठी अर्ज केलेले आहेत अशा पालकांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश त्या-त्या कार्यक्षेत्रांमधील इतर शाळांमध्ये आपल्या इच्छेनुसार घ्यावेत, असे यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी वनीता सोनवणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.