जामीन मिळालेल्या आरोपींची सुटका लांबणीवर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 11:53 PM2019-10-05T23:53:23+5:302019-10-05T23:55:27+5:30
घरकुल प्रकरणात जामीन मंजूर झालेल्या आरोपींची सुटका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. शनिवारी सायंकाळी जामीनाचे अधिकृत आदेश खंडपीठाने काढले, मात्र आरोपींच्या वकीलांच्या हातात या आदेशाचे प्रत सायंकाळी उशिरापर्यंत मिळाली नाही. न्यायालयाची वेळ संपल्याने आता सोमवारीच आदेशाची अधिकृत प्रत प्राप्त होईल. सोमवारी दिवसभरात लवकर जामीनाची पूर्तता झाली तरच या आरोपींची सुटका होईल, अन्यथा बुधवारीच आरोपी कारागृहातून बाहेर येतील.
जळगाव : घरकुल प्रकरणात जामीन मंजूर झालेल्या आरोपींची सुटका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. शनिवारी सायंकाळी जामीनाचे अधिकृत आदेश खंडपीठाने काढले, मात्र आरोपींच्या वकीलांच्या हातात या आदेशाचे प्रत सायंकाळी उशिरापर्यंत मिळाली नाही. न्यायालयाची वेळ संपल्याने आता सोमवारीच आदेशाची अधिकृत प्रत प्राप्त होईल. सोमवारी दिवसभरात लवकर जामीनाची पूर्तता झाली तरच या आरोपींची सुटका होईल, अन्यथा बुधवारीच आरोपी कारागृहातून बाहेर येतील.
दरम्यान, सुरेशदादा जैन, जगन्नाथ वाणी, राजेंद्र मयूर, प्रदीप रायसोनी, आणि पी. डी. काळे आदींच्या जामीन अर्जांवर १५ आॅक्टोबर तर लता भोईटे या रूग्णालयात असल्यामुळे त्यांच्या जामीन अर्जावर १८ आॅक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. सोमवारी खंडपीठातून अधिकृत मिळाल्यानंतर धुळे न्यायालयात या आरोपींनी दंडाची रक्कम भरली आहे किंवा नाही याची खात्री केली जाईल, त्यानंतर प्रत्येक आरोपीला एक लाखाचा जातमुचलका (सॉल्वंशी) सादर करावी लागले.त्यानंतर सर्वांचे पासपोर्ट न्यायालयात जमा करावे लागतील. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर न्यायालय नाशिक कारागृहाच्या नावाने आरोपींच्या सुटकेचे आदेश देईल. हे आदेश कारागृहाच्या वेळेत मिळाले तर सायंकाळपर्यंत सुटका होईल, अन्यथा मंगळवारी दसºयाची सुटी असल्याने बुधवारीच आरोपींची सुटका होईल. दरम्यान, आरोपींची संख्या जास्त असल्याने धुळे न्यायालयातच प्रक्रिया पूर्ण व्हायला सायंकाळ होण्याची शक्यता आहे.