लघु सिंचनच्या कामांना स्थगिती कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 12:12 PM2019-09-03T12:12:07+5:302019-09-03T12:12:27+5:30

निकष स्पष्ट करायला समितीची स्थापना

Postponement of minor irrigation works | लघु सिंचनच्या कामांना स्थगिती कायम

लघु सिंचनच्या कामांना स्थगिती कायम

Next

जळगाव : जिल्हा परिषदेच्या लघू सिंचन विभागातर्फे यंदाच्या निधीतील १२ कोटींची कामे नेमकया कोणत्या निकषांनी करण्यात येत आहेत याबाबत कार्यकारी अभियंता आऱ के़ नाईक पूर्ण माहिती देत नसल्याने या कामांचे कार्यरंभ आदेश थांबविण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे़ याबाबत एक समिती नियुक्त करण्यात आली असून समितीच्या अहवालापर्यंत ही स्थगिती कायम राहणार आहे़ स्थायी समितीच्या सभेत हा निर्णय झाला़
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली़ सर्वाधिक ग्रामपंचायत विभागाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करण्यात आली़
यासह जुनी इमारत पाडून या ठिकाणी नवी इमारत उभी करण्यासाठी शासनाकडून निधी घ्यावा, बिओटी तत्त्वावर ही इमारत उभी करू नये असा निर्णय झाला़ बीओटी तत्त्वाला सदस्य नानाभाऊ महाजन व शशिकांत साळुंखे यांनी विरोध दर्शविला़ यानंतर सर्व कायदेशीर बाबी पडताळून सर्वसाधरण सभेची मंजूरी घेऊन शिवतीर्थ मैदानावर व्यापारी संकुल उभारणीसंदर्भात चर्चा करण्यात आली़
गेल्या स्थायी समितीच्या सभेत सिंचनच्या १२ कोटींच्या कामांचे कार्यारंभ आदेश थांबविण्यात आले होते़ जलयुक्त शिवार अभियानाच्या निकषानुसार सत्तर टक्के दुरूस्ती व तीस टक्के नवीन कामे अशी ही कामे नसल्याने नेमक्या कुठल्या निकषांनी ही कामे होणार आहेत, हे कार्यकारी अभियंता वगळून अन्य अधिकाऱ्यांनी पुराव्यानिशी सभागृहाला पटवून द्यावे, तेव्हा या कामांना कार्यारंभ आदेश देण्यास कुणाचा विरोध राहणार नाही, असा मुद्दा मांडण्यात आला़ यावर सीईओंच्या अध्यक्षतेखाली एसीईओंचा समावेश असलेली एक समिती स्थापन करण्यात आली व पुढील स्थायी समितीच्या सभेत ही समिती या कामांचे निकष सभेला सांगणार आहे़ ग्रामनिधी कर्जाचे २० कोटी रूपयांपैकी वर्षभरात केवळ ६० लाख रूपये वसूल झाले आहेत़ यासह पाणीपुरवठा योजनेतील कर्मचारी हस्तांतरणाबाबत दस्तावेज उपलब्ध नसून या कर्मचाऱ्यांवर गेल्या ११ वर्षापासून ११ कोटी रूपये खर्च झाले, मात्र त्यांचे कागदपत्रच उपलब्ध नसल्याचा खुलासा अधिकाºयांनी बैठकीत केला़ या विषयावर चर्चा झाली़ यासह एरंडोल तालुक्यात गटविकास अधिकारी व अतिरिक्त गटविकास अधिकारी कार्यरत नसल्याने कामे खोळंबत असल्याचा मुद्दा नानाभाऊ महाजन यांनी मांडला़
चौदाव्या वित्त आयोगासाठी आठ दिवस बैठका
ग्रामपंचायतींकडे चौदाव्या वित्त आयोगाचा कोट्यवधी निधी पडून आहे़ त्यात आणखी ७० कोटींचा हफ्ता प्राप्त झाला असून सर्व ग्रामपंचायतींच्या अडचणी ऐकून घेण्यासाठी प्रत्येक पंचायत समिती येथे बीडिओ, ग्रामसेवक, सरपंच यांची संयुक्त बैठक जिल्हा परिषदेतर्फे घेण्यात येणार आहे़ ४ ते १२ सप्टेंबर दरम्यान या बैठका होणार असल्याचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी सांगितले़

Web Title: Postponement of minor irrigation works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव