वरणगाव पाणी पुरवठा योजनेवरची स्थगिती उठली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 08:15 PM2020-04-20T20:15:20+5:302020-04-20T20:15:33+5:30

२४ तास पाणी मिळणार : नगराध्यक्ष सुनील काळे यांची माहिती

Postponement of Varangaon Water Supply Scheme | वरणगाव पाणी पुरवठा योजनेवरची स्थगिती उठली

वरणगाव पाणी पुरवठा योजनेवरची स्थगिती उठली

Next


वरणगाव : येथील पााणीपुरवठा योजनेवरील स्थगिती उठविण्यात आली आहे. यामुळे आता वरणगावकर यांना २४ तास पाणीपुरवठा मिळू शकेल अशी माहिती नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिली.
शहरासाठी भाजप सरकारच्या कार्यकाळात २५ कोटीची पाणीयोजना तत्कालीन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मंजूर करून दिली. मंजूर पाणी पुरवठा योजनेच टेंडर प्रक्रिया सुद्धा पूर्ण केली मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या योजनेला स्थगिती दिली. स्थगिती उठवण्यात यावी यासाठी नगराध्यक्षांनी औरंगाबाद उच्चनयालयात रिट पिटीशन दाखल केली होती तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल कोशियार, माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री संजय सावकारे यांच्याकडे मागणी केली होती. यावर आमदार महाजन व सावकारे यांनी देखील पत्रव्यवहार करून सदरच्या योजनेचे गांभीर्य शासनाला कळविले होते.
गिरीश महाजन यांचा पाठपुरावा
ही स्थगिती त्वरित उठवावी अशा प्रकारची मागणी माजी मंत्री गिरीश महाजन यांनी करीत मुंबईत या प्रक्रियवर लक्ष देऊन होते. दरम्यान सोमवारी नगर विकास विभागाचे सहसचिव पां. जो . जाधव यांनी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत पाणीपुरवठा मलनिस्सारण रस्ते प्रकल्प मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी ज्या प्रकल्पांचे कायार्देश दिनांक ५ डिसेंबर २०२० पूर्वी देण्यात आले नव्हते अशा प्रकल्पांचे कायार्देश पुढील आदेशापर्यंत देण्यात येऊ नये अशा सूचना शासनाने दिल्या होत्या. त्यासंदर्भात सोमवारी सुधारित सूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात आली आहे. त्यानुसार निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असल्यास कार्यादेश देण्याची कार्यवाही त्वरित पूर्ण करण्यात यावी व त्याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल ३० एप्रिलपर्यंत शासनाला सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे वरणगाव येथील पाणी पुरवठा योजनेचे कामाचे रस्ता मोकळा झाला आहे.
निविदा प्रक्रिया पूर्ण
शहरातील पाणीपुरवठा योजनेची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून याबाबत पालिकेकडे निविदा आलेया आहेत या ओपन केल्यानंतर कार्यादेश देता येईल. तसेच पालिकेच्या खात्यावरती सहा महिन्यापूर्वीच सव्वा कोटी रुपए निधी जमा आहे

 

Web Title: Postponement of Varangaon Water Supply Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.