जिल्ह्यातील ४०९ आरोग्य सेवकांची पदे रिक्तच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 12:13 PM2020-01-13T12:13:02+5:302020-01-13T12:13:19+5:30
जळगाव : मनुष्यबळांच्या कमतरतेमुळे आरोग्य सेवेवर होणारे परिणाम वारंवार समोर आलेले आहेत़ त्यातच गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात आरोग्य सेवकांच्या ...
जळगाव : मनुष्यबळांच्या कमतरतेमुळे आरोग्य सेवेवर होणारे परिणाम वारंवार समोर आलेले आहेत़ त्यातच गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात आरोग्य सेवकांच्या ४०९ पदांची जाहीरात काढण्यात आली होती़ मात्र, वर्ष उलटूनही ही भरतीप्रक्रिया पुढे सरकली नसल्याने या जागा अद्यापही रिक्तच आहे़ त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत असल्याचे चित्र आहे़
नुकतेच सातगाव डोंगरी येथील आयुर्वेदीक रूग्णालयात चक्क शिपायी रूग्णांना औषधी देत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता़ डॉक्टरांकडे वरखेडी व लोहारा येथील अतिरिक्त कारभार असल्याने ते या ठिकाणी येत नाहीत, असे सांगण्यात आले़ मात्र, या डॉक्टरांची मूळ पदस्थापना ही सातगाव डोंगरीच असून त्यांनी या ठिकाणीच थांबणे बंधनकारक असल्याचे पत्रही त्यांना देण्यात आले .
१५ जानेवारीला एका पदासाठी परीक्षा
अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे या संवर्गातील एक आरोग्य सेवक (पुरूष) या पदासाठी परीक्षा होणार आहे़ या एका जागेसाठी जिल्हाभरातून ३०० अर्ज आलेले होते़ मात्र निकषात न बसणारे ८० उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आले असून उर्वरित २२० उमेदवारांची एका पदासाठी १५ जानेवारी रोजी विद्यानिकेत व कनिष्ठ महाविदलयात सकाळी ११ ते १२:३० वाजेदरम्यान परीक्षा होणार आहे़ २०० गुणांची ही परीक्षा असेल यात मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धीक चाचणी आदी विषयांची प्रत्येकी ५० मार्काचंी ही परीक्षा असेल़