जळगावात रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतला उद्योजकाचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 12:29 PM2019-07-14T12:29:18+5:302019-07-14T12:29:27+5:30

दुचाकीवरुन तोल जाऊन पडल्याने मिनीट्रक गेली डोक्यावरुन

A pothole on the road victim of the entrepreneur | जळगावात रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतला उद्योजकाचा बळी

जळगावात रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतला उद्योजकाचा बळी

Next

जळगाव : रस्त्यांवर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांनी एका उद्योजकाचा बळी घेतला. घराकडे परतणारे द्वारका इंडस्ट्रीजचे संचालक अनिल श्रीधर बोरोले (६८, रा़ पोस्टल कॉलनी) यांची दुचाकी चित्रा चौकाजवळील खड्ड्यामुळे उधळली आणि ते दुचाकीसह रस्त्यावर पडले़ त्याचवेळी मागून येणाऱ्या मिनी ट्रकने त्यांना चिरडले आणि त्यांचा करुण अंत झाला. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली.
दरम्यान, अपघातानंतर मिनी ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. तर दुसरीकडे खड्ड्यांमुळो बळी गेल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला़ अनिल बारोले हे शहरातील पोस्टल कॉलनी येथे पत्नी शितल व मुलगा निरंजन यांच्यासह वास्तव्यास होते़ एमआयडीसी परिसरात त्यांची द्वारका इंडस्ट्रीज ही कंपनी असून याठिकाणी इलेक्ट्रीक कंट्रोल पॅनल बनविले जातात़ शनिवारी सुटी असल्याने सायंकाळी ते शहरात त्यांच्या खाजगी कामानिमित्त आले होते़ दुचाकीने (एमएच़१९़डीबी़ ४०४८) घराकडे निघाले़ चित्रा चौकाजवळील चार फुट लांबीचा खड्ड्यातून त्यांची दुचाकी गेली अन् तोल जावून दुचाकीसह ते रस्त्यावर कोसळले़ मागून येणाºया मिनी ट्रक (एमएच़०४़डीडी़६४५३) चे मागील चाक हा त्यांच्या डोक्यावरून गेले.
बघ्यांची गर्दी तर दुसरीकडे वाहतूक विस्कळीत
अपघात होताच चित्रा चौकात बघ्यांची प्रचंड गर्दी झालेली होती़ दुसरीकडे अपघात झालेला रस्ता हा बंद झाल्यामुळे दुसºया एकाच मार्गाने वाहतूक सुरू झाली़ त्यामुळे वाहतूकीचा खोळंबा झाला होता़ ही वाहतूक सुरळीत करण्यास शहर वाहतूक पोलिसांच्या नाकीनऊ आले़ काही वेळानंतर मृतदेह जिल्हा रूग्णालयात नेण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी रस्त्यावर झालेली गर्दी पांगविली़
कधी येईल मनपा प्रशासनाला जाग ?
शहरातील खड्डयांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे़ सर्वाधिक अपघात महामार्गावर झालेली आहेत़ मात्र, आता चक्क शहरातच खड्डयामुळे उद्योजकाला आपला जीव गमवावा लागला़ मनपा प्रशासनाने आता तरी शहरातील रस्त्यांचा विचार करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे़
आमदारही पोहोचले घटनास्थळी
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर आमदार सुरेश भोळे व आमदार चंदूलाल पटेल यांनी घटनास्थळी नंतर जिल्हा रुग्णालयात पोहोचले.
नागरिकांचा प्रचंड संताप
सध्या शहरातील रस्त्यांची स्थिती अत्यंत खराब असून जागो-जागी खड्डे पडलेले आहेत. पावसामुळे रस्त्यांवर प्रचंड चिखल होत आहे. त्यामुळे चालणेही कठीण झाले आहे. त्यातच शनिवारी सायंकाळी खड्ड्यांमुळे अनिल बोरोले यांचा मृत्यू झाल्यानंतर नागरिकांनी लोकप्रतिनिधींबद्दल तीव शब्दात नाराजी व्यक्त करित संताप व्यक्त केला़ नगरसेवकांना अपात्र ठरवा व रस्त्यांची त्वरित दुरूस्ती करण्याची मागणी केली़
कागदपत्रांवरुन पटली ओळख
अपघात होताच मिनी ट्रकचालकाने पळ काढला़ अपघात झाल्यानंतर घटनास्थळी प्रचंड नागरिकांनी गर्दी केली़ शहर वाहतूक व जिल्हापेठ आणि शहर पोलीसही घटनास्थळी पोहचले. चेहºयाचा चेंदामेंदा झाल्यामुळे मयत व्यक्ती कोण होती़ हे कुणालाही ओळखता येत नव्हते़ अखेर दुचाकीत मिळालेले काही कागदपत्रांमुळे त्यांची ओळख पटली.
अनिल बोरोले हे जळगाव जिल्हा लेवा पाटीदार मंडळाचे अध्यक्ष होते. रामानंद नगर परिसरात समाजातील मुलांसाठी सुरु केलेले वसतिगृह गेल्या १५ वर्षापासून सुरु आहे. रोटरी क्लब आॅफ जळगाव वेस्टचे माजी अध्यक्ष होते. अजातशत्रू व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख होती.

Web Title: A pothole on the road victim of the entrepreneur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव