मुक्ताईनगरात वीज कंपनी व तहसील कार्यालयात वसुलीवरून जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:12 PM2018-02-23T12:12:14+5:302018-02-23T12:15:24+5:30

कारवाईचा फटका जमसमान्यांना

power company and the tehsil office were recovered | मुक्ताईनगरात वीज कंपनी व तहसील कार्यालयात वसुलीवरून जुंपली

मुक्ताईनगरात वीज कंपनी व तहसील कार्यालयात वसुलीवरून जुंपली

Next
ठळक मुद्दे१७ हजार रुपयांची वीजबिल थकबाकी वीज कंपनीकडे ९८ हजार रुपये थकबाकी

आॅनलाइन लोकमत
मुक्ताईनगर, जि. जळगाव, दि. २३ - थकीत विजबिला पोटी तहसील कार्यालयाचा वीजपुरवठा खंडीत करणाºया वीजवितरण कंपंनीच्या कारवाईस प्रत्युत्तर म्हणून अवघ्या तासाभरात महसूल थकबाकी पोटी थेट शहरातील वीज उपकेंद्र सील करण्याची कारवाई महसूल विभागाने केली. शासन व शासन अखत्यारीत विभागाची परस्पर विरोधी कारवाई शासनाची लक्तरे वेशीवर टांगणारी होय
या कारवाईचा फटका जमसमान्यांना बसला आहे एकतर तहसीलला वीजपुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांची कामे रखडली तर दुसरीकडे वीज उपकेंद्र सील करण्यात आल्याने मुक्ताईनगर व कोथळी गावाचा वीजपुरवठा खंडीत झाला.
वीजवितरण कंपनी तर्फे तहसीलदार कार्यालयाच्या १७ हजार रुपयांची वीजबिल थकबाकी पोटी नोटीसा बजविण्यात आल्या मुदतीत थकीत वीजबिल न भरल्याने गुरुवारी ११ वाजता वीज वितरण कर्मचाºयांनी तहसीलचा वीज पुरवठा खंडीत केला दरम्यान या कारवाईनंतर महसूल तर्फे ही वीजवितरण कंपनी कडे तालुक्यातील १० वीज उपकेंद्रे उभारण्यात आलेल्या जागेच्या अकृषक आकारणी साठी तब्बल ९८ हजार रुपये थकबाकी वसुलीसाठी निवासी नायब तहसीलदार नीलेश पाटील यांच्या आदेशाने महसूल कर्मचाºयांनी दुपारी दीड वाजता शहरातील वीज उपकेंद्र पोलीस बंदोबस्तात सील केले.
तर उर्वरीत उपकेंद्रे सील करण्याची तयारी सुरू आहे
दुसरी कडे वीज वितरणकंपनी महसूल च्या कारवाईला बेकायदेशीर असल्याचे सांगत आहे वीज उपकेंद्र सील केल्या प्रकरणी महसूल कर्मचारी विरोधात फौजदारी कारवाई साठी विजवीतरण कंपनी चे अधिकारी महेश पाटील व सहकारी पोलिसात गेले होते अधिकच्या कायदेशीर सल्ल्या नंतर गुन्हा दाखल करण्याची भूमीका त्यांची दिसून आली.
दरम्यान, या घटनेत पाऊने पाच वाजता चक्रे फिरली व माजी मंत्री एकनाथराव यांनी जिल्हाधिकाºयांना याबाबत माहिती दिली आणि तात्काळ महसूल विभागाने वीज उपकेंद्रास लावलेले सील काढण्यास धावपळ सुरू केली. पाच विजेच्या सुमारास सील काढण्यात आले. दुसरीकडे याच दरम्यान विजवीतरण कंपनीने मुदत वाढ देत तहसीलदार कार्यालयाचा खंडीत केलेली वीज जोडणी पूर्ववत करून दिला. एकंदरीत राजकारण्यांना ही लाजवेल असा घटना क्रम शासन अखत्यारीत वीज वितरण कंपनी व महसूल विभागाच्या अहंकारा तुन तब्बल साडेतीन तास नागरिकांना वेठीस धरले होते.

Web Title: power company and the tehsil office were recovered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.