सकारात्मक विचारात कोरोनाला हरविण्याची शक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:17 AM2021-04-28T04:17:59+5:302021-04-28T04:17:59+5:30
जळगाव : कोरोनाची लढाई निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. यात आरोग्य, शासन-प्रशासन यंत्रणेबरोबर नागरिकांच्या सकारात्मक चिंतनाचा मोठा सहभाग असणार ...
जळगाव : कोरोनाची लढाई निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. यात आरोग्य, शासन-प्रशासन यंत्रणेबरोबर नागरिकांच्या सकारात्मक चिंतनाचा मोठा सहभाग असणार आहे. मानसिक स्वास्थ्यास सकारात्मक विचारांची ऊर्जाच या निर्णायक युद्धात कोरोनाला हरवू शकणार आहे असा आशावाद सुप्रसिद्ध समुपदेशक व वक्त्या सिस्टर बी.के. शिवानी दीदी यांनी ऑनलाईन वेबिनारमध्ये केला.
ब्रह्माकुमारीतर्फे `अपनी मुश्किलों से बडे बनो` या ऑनलाईन वेबिनारचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते, त्यात त्या बोलत होत्या. यावेळी बी. के. शिवानी यांनी आपण जो विचार करतो, त्याचा परिणाम आपल्या शारीरिक स्वास्थावर होतो. आमचे संकल्प दुसऱ्या व्यक्तिवर प्रभाव टाकतात. आपण जे विचार करतो, त्याचा वातावरणावरही परिणाम होतो. त्यामुळे आपले घर, आपली कॉलनी, शहर आणि देशात बदल होतात. सकारात्मक विचाराने दोन महिन्यात संपूर्ण देशाचे चित्र आपण बदलवू शकणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
इन्फो :
हजारो नागरिकांनी घेतला वेबिनारचा लाभ
या ऑनलाईन वेबिनारच्या झूमवर एक हजार तर यु ट्यूबवर सुमारे तीस हजाराहून अधिक नागरिकांनी लाभ घेतल्याचे माध्यम समन्वयक डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी सांगितले. ऑनलाईन वेबिनारच्या प्रारंभी ब्रह्माकुमारी वासंती यांनी प्रास्ताविक केले, तर बी.के. वीणा यांनी आभार मानले.