सत्ताधा:यांची शंभरी, भुसावळ शहराचा विकास मात्र शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2017 11:02 AM2017-04-19T11:02:34+5:302017-04-19T11:02:34+5:30

भुसावळात सत्तेवर येऊन शंभर दिवस उलटल्यानंतरही शहरात विकासाची गंगा अवतरली नसल्याचे चित्र आह़े

Power: The development of the century, city of Bhusaval is only zero | सत्ताधा:यांची शंभरी, भुसावळ शहराचा विकास मात्र शून्य

सत्ताधा:यांची शंभरी, भुसावळ शहराचा विकास मात्र शून्य

googlenewsNext

 ऑनलाईन लोकमत विशेष /गणेश वाघ  

भुसावळ, दि.19 - देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, सबके के साथ सबका विकास, एक हाती सत्ता द्या, बदल घडवू, अशा आश्वासनांच्या जोरावर भुसावळ पालिकेत अनेक वर्षानंतर सत्तांतर घडल़े माजी आमदार संतोष चौधरी यांच्या सत्तेला सुरूंग लावत भाजपाने एकहाती सत्ता मिळवत भुसावळात इतिहास घडवला. मात्र, सत्तेवर येऊन शंभर दिवस उलटल्यानंतरही शहरात विकासाची गंगा अवतरली नसल्याचे चित्र आह़े
निवडणुकीत दिलेली आश्वासने हवेत विरल्याचा शहरवासीयांना अनुभव येत आह़े रस्त्यांची समस्या जैसे थे आहे, अशुद्ध पाणीपुरवठय़ाची डोकेदुखी, शहरभर कचरा साचला आहे, पथदिवे बंद आहेत हे चित्र सत्तांतरानंतरही बदलले नसल्याने जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होत आह़े
विकासाच्या नुसत्याच गप्पाच
शहरातील सर्वाधिक मोठी स्वच्छतेची समस्या आह़े शहरातील प्रत्येक भागात कचरा नुसताच तुंबला नाही, तर ओसंडून वाहत असल्याचे चित्र आह़े आहे त्या कचराकुंडय़ा तुटल्या आहेत, तर काही भागात कचराकुंडय़ाच नाही. त्यामुळे महिला गटारीत कचरा फेकत असल्याने गटारी तुंबल्या आहेत़  
अशुद्ध पाणीपुरवठा
शहरवासीयांना अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये संतप्त भावना आह़े जलशुद्धीकरणाचा प्लँट ब्रिटिशकालीन आह़े अटल योजनेत शहराचा समावेश झाला असला, तरी प्रत्यक्षात योजना सुरू होण्यासाठी अनेक वर्ष लागणार आहेत. त्यामुळे आहे त्या प्लँटमध्ये सुधारणा झाल्यास अशुद्ध पाणीपुरवठय़ाची डोकेदुखी कमी होणार आह़े
घंटागाडय़ांचे घोडे अडले कुठे?
राष्ट्रवादीच्या काळातील दोघा तत्कालीन नगराध्यक्षांनी 47 घंटागाडय़ा मंजूर झाल्याचे सुतोवाच करीत सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन मंजुरी मिळाल्याचेही सांगितले. मात्र घोडे अडले कुठे? असा प्रश्न आह़े घंटागाडय़ांची खरेदी झाली असती, तर  कच:याचा  प्रश्न सुटला असता़
रस्ते सोसताय घाव
शहरातील मुख्य वर्दळीच्या रस्त्यांसह अंतर्गत रस्ते घाव सोसत आहेत़ नगरोत्थान योजनेत टाकलेल्या मामाजी टॉकीज रस्त्याचे भाग्य अद्यापही उजळलेले नाही. ही योजनाच शहरासाठी रद्द झाली़ सर्वसाधारण रस्तेकामाला मंजुरी मिळाली मात्र कामाला सुरुवात नाही़ पावसाळ्यापूर्वीच  कामे न झाल्यास पुन्हा चार महिने प्रतीक्षाच आह़े
 
सत्तेवर आल्यानंतर शंभर दिवस पूर्ण झाले असले, तरी प्रत्यक्षात कामकाजाचे दिवस आम्हाला कमीच मिळाले आहेत़ जुने सत्ताधारी एक महिना सत्तेवर राहिले. त्यानंतर पदवीधर मतदारसंघ व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागली़ त्यानंतर मुख्याधिकारी यांची प्रकृती बिघडल्याने ते सुटीवर गेल़े सर्वसाधारण बैठकीत 1 ते 24 प्रभागांतील विविध विकासाचे विषय घेतल़े दिलेल्या प्रत्येक आश्वासनांचे पालन होईल़
-रमण भोळे, नगराध्यक्ष, भुसावळ

Web Title: Power: The development of the century, city of Bhusaval is only zero

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.