प्रात्यक्षिकातून जाणून घेतली उर्जानिर्मिती प्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 12:10 PM2020-02-08T12:10:51+5:302020-02-08T12:14:31+5:30
कार्यशाळा : प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांनी केले मार्गदर्शन
जळगाव- केसीई अभियांत्रिकीच्या सीआरएसच्यावतीने ‘अपारंपारिक उर्जा, कौशल्य विकास आणि करिअर’ या विषयावर आयोजित एक दिवसीय कार्यशाळा नुकतीय खिरोदा येथील धनाजी नाना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात पार पडली. या कार्यशाळेत प्राध्यापकांनी प्रात्यक्षिकातून अपारंपारिक उर्जेचे विद्यार्थ्यांना महत्व पटवून दिले तर उर्जा निर्मितीची प्रक्रियाही प्रात्यक्षिकातून समजावून सांगितली.
या कार्यशाळेचे उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य तुकाराम बोरोले, केसीई अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. राजेश वाघुळदे, प्रा. लीना वाघुळदे, प्रा.धीरज पाटील, प्रा.सचिन सोनवणे, मेनका चौधरी आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक प्राचार्य तुकाराम बोरोले यांनी केले. त्यात त्यांनी आजच्या काळात विद्यार्थ्यांना भविष्यात नवी दिशा देण्याचे काम नक्कीच उपयुक्त ठरणार आहे, असे सांगितले. नंतर प्रा. वाघुळदे यांनी कार्यशाळेची रूपरेषा, महत्व आणि उर्जा बचतीचे महत्व विषद केले. तर प्रा. सचिन सोनवणे यांनी कौशल्य विकासाचे विविध पैलू, भावनिक कौशल्य, विविध कोर्सेस बद्दल माहिती दिली.
प्रात्यक्षिकातून दिली माहिती
दुपारच्या द्वितीय सत्रात अपारंपारिक उर्जेचे महत्व, उर्जा निर्मिती प्रक्रिया या विषयी प्रा. धीरज पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच सोलर प्लेटच्या माध्यमातून प्रात्यक्षिक करून उर्जेची निर्मिती तसेच त्याचे महत्व प्रा. राजेश वाघुळदे यांनी पटवून दिले. यावेळी विद्यार्थ्यांनी सुध्दा प्रात्यक्षिकाचा आनंद घेतला. शेवटच्या सत्रात प्रा. लीन वाघुळदे यांनी दहावी व बारावी नंतर पुढे काय अणि पुढील संधी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तर विकास पाटील आणि स्मिता इंगळे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन आणि आभार हेमलता चौधरी यांनी केले. तब्बल १०० विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत सहभाग नोंदविला होता़ यशस्वीतेसाठी प्रा. डी.आर. फेगडे, मेनका चौधरी, पी.एन.ख़वले, प्रमोद महाजन, नरेंद्र पाटील आदींनी परिश्रम घेतले.