३३ केव्ही विदगाव उपकेंद्राचा वीज पुरवठा अचानक खंडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:22 AM2021-06-16T04:22:10+5:302021-06-16T04:22:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद : महावितरणच्या विदगाव येथील ३३ केव्ही उपकेंद्राला वीज पुरवठा करणाऱ्या उच्चदाब वाहिनीत मंगळवारी दुपारी अचानक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : महावितरणच्या विदगाव येथील ३३ केव्ही उपकेंद्राला वीज पुरवठा करणाऱ्या उच्चदाब वाहिनीत मंगळवारी दुपारी अचानक बिघाड झाल्याने परिसरात मोठा ब्रेक डाऊन झाला. सदर बिघाड शोधण्यात यंत्रणेला रात्री उशिरापर्यंत यश आले नव्हते.
ममुराबादसह परिसरातील धामणगाव, नांद्राखुर्द, खापरखेडा, आवार, तुरखेडा आदी बऱ्याच गावांच्या परिसरात गेल्या दहा ते बारा दिवसांपासून वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे लहान व मोठ्या उद्योग- व्यवसायांवर देखील परिणाम झाला आहे. यात मंगळवारी दुपारी जळगावहून विदगावकडे जाणाऱ्या अतिउच्च दाबाच्या वाहिनीत मोठा बिघाड झाल्याने वीज पुरवठा अचानक खंडीत झाला. रात्री उशिरापर्यंत तो सुरळीत होऊ शकला नाही. त्यामुळे वीज ग्राहकांना घामाघूम व्हावे लागले. दरम्यान, जळगावकडील वीज पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत कानळदा उपकेंद्राकडून वीज जोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दिली.