ममुराबाद- विदगाव रस्त्यावरील खांब पडल्यामुळे वीज खंडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:15 AM2021-05-15T04:15:41+5:302021-05-15T04:15:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद: विदगाव रस्त्यालगतच्या उच्चदाब वाहिनीचा सिमेंट खांब अचानक तुटून पडल्यामुळे संपूर्ण शेती शिवाराचा वीज पुरवठा गेल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद: विदगाव रस्त्यालगतच्या उच्चदाब वाहिनीचा सिमेंट खांब अचानक तुटून पडल्यामुळे संपूर्ण शेती शिवाराचा वीज पुरवठा गेल्या दोन दिवसापासून ठप्प झाला आहे.
महावितरणच्या विदगाव येथील ११ केव्ही उपकेंद्रावरील वाहिनीचा एक सिमेंटचा खांब गुरुवारी कोणतेही वारा वादळ नसताना अचानक तुटून पडला. सुदैवाने खांब पडला त्यावेळी तिथे कोणी शेतकरी किंवा शेतमजूर नव्हते. त्यामुळे मोठी जीवित हानी टळली. कारण, खांब पडलेल्या शेतात नुकतेच पाणी भरलेले होते. घटनेची माहिती मिळताच विदगाव उपकेंद्रावरून लगेच वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला असला तरी दुसरा दिवस उजाडल्यानंतरही तुटलेला खांब बदलण्याच्या बाबतीत कोणतीच हालचाल महावितरणकडून झाली नाही. परिणामी, संपूर्ण ममुराबाद शिवारातील शेतीपंप बंदच आहेत.
---------------------
(कोट)...
विदगाव उपकेंद्रावरून ममुराबादकडे जाणाऱ्या शेतीपंपाच्या वीज वाहिनीचा खांब तुटल्यामुळे त्या भागातील वीज पुरवठा खंडित करावा लागला आहे. ठेकेदाराकडून अक्षय तृतीयेनंतर लगेचच सदर खांब बदलण्यात येईल व वीज पुरवठा सुरळीत केला जाईल.
- कल्पेश सपके, उपअभियंता, महावितरण
-----------------
फोटो-
ममुराबाद- विदगाव रस्त्यालगतच्या एका शेतात खांब तुटून पडल्यामुळे शेतीपंपांचा वीज पुरवठा दोन दिवसापासून ठप्प झाला आहे. (जितेंद्र पाटील)