३४ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित
By admin | Published: March 6, 2017 12:48 AM2017-03-06T00:48:55+5:302017-03-06T00:48:55+5:30
जळगाव : थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने परिमंडळात थकबाकी वसुली व वीजपुरवठा खंडित करण्याची महामोहीम सुरु आहे़
जळगाव : थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने परिमंडळात थकबाकी वसुली व वीजपुरवठा खंडित करण्याची महामोहीम सुरु आहे़
यात जळगाव मंडळात १२ कोटी ५१ लाखांची थकबाकी थकविणाºया ३४ हजार ५४६ घरगुती, वाणिज्य तसेच औद्योगिक ग्राहकांचा विजपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला आहे़
मुख्य अभियंता बीक़े ़जनवीर यांनी जानेवारी अखेर सर्व विभाग, उपविभागांतील अधिकाºयांची बैठक बोलावून थकबाकी वसुलीचे आदेश दिले आहेत़
सात उपविभागात कारवाईसाठी पथके नियुक्त करण्यात आली आहे़ त्यांनी दोन महिन्यात ३४ हजार ५४६ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत केला आहे़
थकबाकी भरल्यावरच ग्राहकांचा विजपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याने तोपर्यंत रात्र अंधारात काढावी लागणार आहे़
मंडळनिहाय कारवाई
मंडळ थकबाकी ग्राहक
जळगाव १२ कोटी ५१ लाख ३४५१६
धुळे ४ कोटी ११ लाख ३९४७
नंदुबार १ कोटी ६१ लाख ३०२८
एकूण १८ कोटी २४ लाख ४१५१४