कासोद्यासह पाच गावांच्या पाणी योजनेचा वीजपुरवठा तोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 01:52 AM2018-11-18T01:52:22+5:302018-11-18T01:54:29+5:30

प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा बिल न भरल्याने १६ नोव्हेंबर पासून खंडीत करण्यात आला आहे. नदीला भरपूर पाणी असून देखील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ प्रशासनामुळे आली आहे.

 The power supply of five villages with Kesoda was broken | कासोद्यासह पाच गावांच्या पाणी योजनेचा वीजपुरवठा तोडला

कासोद्यासह पाच गावांच्या पाणी योजनेचा वीजपुरवठा तोडला

googlenewsNext
ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली ?स्थानिक शिखर समिती व सरपंचाचे प्रयत्नही निष्फळ

कासोदा, ता. एरंडोल : येथील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा बिल न भरल्याने १६ नोव्हेंबर पासून खंडीत करण्यात आला आहे.
नदीला भरपूर पाणी असून देखील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ प्रशासनामुळे आली आहे. विशेष हे की, याच महिन्यांत पालकमंत्र्यांनी कोणत्याच सार्वजनिक पाणी योजनेचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार नसल्याची माहिती जळगावच्याच बैठकीत दिली होती. पण खुद्द पालकमंत्र्यांच्या आदेशाला अधिकाऱ्यांनी केराच्या टोपलीत फेकून दिले का ? अशा संतप्त प्रतिक्रिया येथे व्यक्त होत आहेत.
कासोदा, आडगांव, तळई, वनकोठा, बांभोरीसह सुमारे एक लाखाच्यावर लोकसंख्या या पाणी पुरवठा योजनेवर अवलंबून आहे. कासोद्यापासून १४ कि.मी.अंतराहून गिरणा नदीवरील दहिगांव बंधाºयातून येथे पाणी पुरवठा होतो. नेहमी प्रमाणे वीज बिल थकल्यामुळे (चालू महिन्याचे चार लाख) वीज वितरण कंपनीकडून हा पुरवठा तोडण्यात आला आहे. स्थानिक शिखर समिती व सरपंचांनी कर वसूली होत नाही, दुष्काळी परिस्थिती आहे, वीज पुरवठा सुरू न झाल्यास रास्ता रोको करू अशा नेहमीच्या पध्दतीने वीज अधिकाºयांकडे शनिवारी प्रयत्न करून पाहिला, पण वीज अधिकारी यांनी त्यांना जुमानले नाही. त्यांनी वरीष्ठांचे आदेश आहेत, त्यामुळेच वीज पुरवठा कापला, या भूमिकेवर ठाम राहून संध्याकाळपर्यंत वीज पुरवठा सुरू केला नाही.
दरम्यान, शिखर समिती, जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार यांनी आपआपल्या पध्दतीने प्रयत्न केलेत, पण सगळे व्यर्थ ठरले. आता जनता मिळेल तेथून पाणी मिळवण्यासाठी भटकत आहे. १८ नोव्हेंबर रोजी रविवार असल्याने सरकारी कार्यालयास सुटी राहिल, सोमवारी काय निर्णय होतो, याकडे आता जनतेचे लक्ष आहे.
दरम्यान, शनिवारी रात्री उशीरापर्यंत वीज मंडळाच्या अधिकाºयांना कोणतेही आदेश नसल्याने वीज जोडणी बाबत हालचाली झालेल्या नव्हत्या. असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
 

Web Title:  The power supply of five villages with Kesoda was broken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.