भुसावळात शासकीय विश्रामगृहाचा वीजपुरवठा थकीत वीज बिलामुळे खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 03:22 PM2018-11-27T15:22:52+5:302018-11-27T15:24:36+5:30
भुसावळ येथील शासकीय विश्रामगृहाच्या संपूर्ण इमारतीमध्ये असलेला वीजपुरवठा वीज वितरण कंपनीने थकीत वीज बिलामुळे खंडित केला होता. वीज बिल भरणा केल्यानंतर तब्बल आठ तासांनी रात्री वीजपुरवठा पूर्ववत सुरू झाला.
भुसावळ, जि.जळगाव : येथील शासकीय विश्रामगृहाच्या संपूर्ण इमारतीमध्ये असलेला वीजपुरवठा वीज वितरण कंपनीने थकीत वीज बिलामुळे खंडित केला होता. वीज बिल भरणा केल्यानंतर तब्बल आठ तासांनी रात्री वीजपुरवठा पूर्ववत सुरू झाला.
यावर रोडवरील शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीचा मागील सहा महिन्यांचे वीज बील एक लाख ५४ हजार आले असून, यासंदर्भात धनादेशाद्वारा वीज वितरण कंपनीत भरणा केला होता, परंतु विलंब झाल्याने वीज बिल वीज वितरण कंपनीने २७ रोजी दुपारी अडीच वाजेपासून संपूर्ण इमारतीचे वीज कनेक्शन कट केले. अशात एखाद्या मंत्र्यांचा दौरा निघाल्यास मोठी नामुष्की ओढवली असती.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता कुरेशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, थकीत वीज बिलासाठी तीन वेळा धनादेश दिले, २७ रोजी आॅनलाइन वीज बिलाचा भरणा केल्यानंतर रात्री दहाला वीजपुरवठा पूर्ववत सुरू झाला.