चाळीसगावी प्रभाती सूर मनामनात रंगले, सोहम गोराणेच्या तबला वादनाने रसिक मंत्रमुग्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 12:50 PM2017-10-21T12:50:43+5:302017-10-21T12:52:44+5:30
गझल, भक्तीगीत, नाटय़गीतांचे सादरीकरण
ऑनलाईन लोकमत
चाळीसगाव, जि. जळगाव, दि. 21 - प्रभाती सुर नभी रंगले..असा सुरमयी आलाप छेडत जॉगिंग असोसिशएन आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमाला शनिवारी पहाटे साडेसहा वाजता सुवर्णा स्मृती उद्यानात सुरुवात झाली. पुणे येथील सुप्रसिद्ध तबला वादक शाम गोराणे, गायिका ज्योती गोराणे, श्रीराम पांढरे, बापू चौधरी, अकरा वर्षीय तबला वादक सोहम गोराणे या कलावंतांनी सुरमधुर गीतांचे सादरीकरण उपस्थित रसिक - श्रोत्यांची मने जिंकली. दीपप्रज्वलन व्यापारी असो. अध्यक्ष प्रदीप देशमुख, जिल्हा दुध संघाचे संचालक प्रमोद पाटील, प.सं. सदस्य अजय पाटील पालिकेचे गटनेते राजेंद्र चौधरी, ल.वि.पाठक, नगरसेविका सविता जाधव, रविंद्र चौधरी यांच्या उपस्थित झाले.
वक्रतुंड समप्रभा स्तवनाने सुरुवात होऊन
दिव्य तुज्या तेजाने, सुवास तुङो मोहुनी (नाटय़गीत), प्रभाती सुर नभी रंगती, विठ्ठल आमुचे सुखाचे जीवन, काया ही पंढरी आत्मा विठ्ठल, मी राधिका प्रेमिका, बगळ्यांची माळ फुले, चांदी जैसा रंग है तेरा, आज जाने की जीद न करो, हमे वो गुजरा जमना याद , विठु माऊली तु, उद्धवा अजब तुङो सरकार, गुरु परमात्मा, ऐंकलेली वाचलेली माणसे गेली कुठे..अशी एकाहुन एक सरस भावगीते, अभंग, गझल सादर करण्यात आल्या. चाळीसगावची बारा वर्षीय स्नेहल सापनर हीने सत्यम शिवम सुंदरम हे गीत सादर करुन टाळ्या घेतल्या.
सोहमच्या तबला वादनाने श्रोते भारावले
अकरा वर्षीय सोहम गोराणे याने तबला वादन करुन श्रोत्यांची वाहवा मिळवली. हार्मोनियम आणि तबल्याच्या जुगलबंदीने रसिक मंत्रमुग्ध झाले. सोहमला 500हुन अधिक पुरस्कार मिळाले आहेत. नऊ महिन्याचा असल्यापासून तो तबला वादन करतोयं.
स्वागत असो.चे अध्यक्ष दीपक देशमुख, सोपान चौधरी, प्रितेश कटारिया यांनी तर प्रास्ताविक व सुत्रसंचालन प्रा. चंद्रकांत ठोंबरे यांनी केले. वसंत चंद्रात्रे, मिनाक्षी निकम यांच्यासह पाचशेहुन अधिक रसिकांनी कार्यक्रमाचा अस्वाद घेतला.