एका महामारीमुळे सुरु झालेल्या प्रथेला दुसऱ्या महामारीने लावला ‘ब्रेक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 03:37 PM2020-07-28T15:37:34+5:302020-07-28T15:37:46+5:30
फैजपूरचा उत्सव: सव्वाशे वर्षांनंतर यंदा प्रथमच बारागाड्या झाल्या रद्द
फैजपूर, ता. यावल : येथे व परिसरात सव्वाशे वर्षांपूर्वी प्लेग/ कॉलरा सारख्या साथीच्या रोगांनी थैमान घातले होते. या साथीच्या रोगाचा नायनाट झाल्यास शहरात बारागाड्या ओढण्यात येतील असे साकड त्यावेळी गावकऱ्यांनी घातले होते. साथीचा रोग आटोक्यात आल्यानंतर बारागाड्या ओढण्याची प्रथा सुरु झाली होती व ती खंड न पडता सुरु होती. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन गरजेचा असल्याने मंगळवारी २८ रोजीचा बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम स्थगित केल्यान १२२ वर्षांची परंपरा प्रथमच खंडीत झाली आहे.
या मारिमातेचे यात्रोउत्सवाला १२१ वषार्ची अखंड परंपरा आहे. दरवर्षी फैजपुरसह परिसरातील भाविक दर्शनासाठी शहरात दाखल होतात. दरवर्षी श्रावण महिन्यात शुल्क दकादशी मंगळवारी या दिवशी बारागाडया उत्साह पूर्ण वातारणात शहरातील अंक्लेशवर - बुºहाणपूर महामार्गावरील म्युनिसिपल हायस्कूल ते सुभाष चौक अशा ओढल्या जातात. बारागाड्या ओढल्या गेल्यानंतर उत्सवासाठी सहकार्य करणाºया प्रतिष्ठित नागरिकांचाउत्सव समिती कडून सत्कार केला जातो. यंदा केवळ मरीमाता देवस्थान येथे पूजेचा कार्यक्रम झाला, अशी माहिती भगत संजय कोल्हे यांनी दिली.