पारोळ्यात व्यापाऱ्यास मारहाण, डोक्यास गंभीर दुखापत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 06:09 PM2019-05-20T18:09:03+5:302019-05-20T18:09:42+5:30
पाच जणांविरुद्ध गुन्हा : करकोळ कारणावरुन झाला वाद
पारोळा : येथील फर्निचर व्यापारी नितीन रमेश भोपळे यांना कारणावरुन मारहाण झाली. यात त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापतर झाली असून उपचारासाठी धुळे येथे नेले होते. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, दिनांक १८ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पारोळा येथील व्यापारी नितीन रमेश भोपळे यांच्या फर्निचर दुकानामागील गोडावून मध्ये ग्राहकाला फर्निचर माल काढुन देण्यासाठी माल वाहतूक रिक्षा गोडावून जवळ आणली असता, गोडावूनच्या शेजारी असलेल्गया कमलबाई महाजन यांना राग आला व त्यांनी नितीन भोपळे याना शिवीगाळ केली. त्यावर नितीन भोपळे यांनी शिवीगाळ करू नका,असे सांगण्याचा प्रयत्न केला असता त्याचा राग येऊन कमलाबाई दयाराम महाजन व सुरेश दयाराम महाजन हे भोपळे यांच्या अंगावर धावून आले. ‘याला जिवंत सोडू नका मारून टाका’ अशी त्यांनी धमकी दिली.
याचबरोबर गणेश दयाराम महाजन , सुरेश दयाराम महाजन , दयाराम झेंडा महाजन, सर्व राहणार गुजराथी गल्ली यांनी भोपळे यांना मारहाण केली .तर रमेश महाजन याने अंगणात पडलेला दगडी फरशीचा तुकडा उचलून भोपळे यांच्या डोक्यात मारला.
यामुळे भोपळे यांचे डोके फुटून त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. दरम्यान काहींनी हे भांडण सोडविले आणि जखमी नितीन भोपळे यांना तात्काळ पारोळा येथे प्राथमिक उपचार करून धुळे येथे नेले. सध्या डॉक्टरांच्या म्हणण्या नुसार भोपळे यांची प्रकृती चिंताजनक नसल्याचे समजते.
या मारहाण प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात नितीन भोपळे यांच्या फिर्यादी वरून कमलबाई महाजन, दयाराम महाजन , रमेश महाजन , सुरेश महाजन गणेश महाजन अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल नाना पवार हे करीत आहे. आरोपींना अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली आहे.