‘प्रहार’नेही वेधले पाण्याकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:13 AM2021-07-20T04:13:27+5:302021-07-20T04:13:27+5:30

नगरपंचायतीची स्थापना २०१७ अखेर झाली असून जवळपास ४ वर्षे उलटून मुक्ताईनगच्या नागरिकांना नगरपंचायत प्रशासनाद्वारे अत्यावश्यक सोयीसुविधांचा लाभ होत ...

‘Prahar’ also drew attention to the water | ‘प्रहार’नेही वेधले पाण्याकडे लक्ष

‘प्रहार’नेही वेधले पाण्याकडे लक्ष

Next

नगरपंचायतीची स्थापना २०१७ अखेर झाली असून जवळपास ४ वर्षे उलटून मुक्ताईनगच्या नागरिकांना नगरपंचायत प्रशासनाद्वारे अत्यावश्यक सोयीसुविधांचा लाभ होत नसून फक्त नगरपंचायतीकडून घरपट्टी, पाणीपट्टी व इतर करांमध्ये भरमसाठ वाढ करण्यात आली आहे.

नागरिकांना सुरळीत व शुद्ध पाणीपुरवठा करणे ही जबाबदारी पार पाडण्यात नगरपंचायत प्रशासन पूर्णपणे अयशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. असा आरोप या संघटनेने केला आहे.

जुनीच पाणीपुरवठा यंत्रणा

येथे जी पाणीपुरवठा यंत्रणा ग्रामपंचायत काळात होती तीच यंत्रणा नगरपंचायत काळात वापरण्यात येत आहे. त्यात काहीही सुधारणा करण्यात आली नाही. जीर्ण पाण्याची टाकी नगरपंचायत प्रशासनाकडून वापरण्यात येत आहे. या टाकीचा स्लॅब पूर्णपणे जीर्ण झाल्यामुळे पडलेला आहे. त्यावर केवळ पत्रे टाकण्यात आलेले आहेत.

शहरातील बऱ्याच प्रभागांमध्ये येणाऱ्या पाण्याला भयंकर दुर्गंधी सुद्धा येत असते. अशा भयावह परिस्थितीमध्ये जे पाणी जनावरे सुध्दा पीत नाहीत ते पाणी शहरवासीयांना पुरवले जात आहे . शहरातील बऱ्याच प्रभागांमध्ये व्हॉल्वमध्ये गटारीचे पाणी पाझरत आहे. प्रशासन वारंवार तक्रारींनंतरही सोयीस्कररित्या दुर्लक्ष करीत आहे. तरी तत्काळ शुद्ध व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यात यावा अशी मागणी ‘प्रहार’ ने केली असून मागणी मान्य न झाल्यास पुढील आंदोलन मोठ्या प्रमाणात केले जाईल, असा इशारा प्रहार संघटनेचे डॉ. विवेक सोनवणे, विलास पांडे ,चंद्रकांत वंजारी, संतोष राजपूत, संदीप इंगळे, अनिकेत सोनार, हृषिकेश पाटील , बापू मेढे, उत्तम जुमळे यांनी दिला आहे. या आंदोलनास महाराष्ट्र नवनिर्माण सेना, एमआयएम, राष्ट्रीय मुस्लीम मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, मायनॉरिटी कौन्सिल ऑफ महाराष्ट्र, लहुजी क्रांती सेना आदींनी समर्थन दिले आहे.

190721\img-20210719-wa0076.jpg

पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीवर आंदोलन करताना डॉ विवेक सोनवणे,विलास पांडे ,चंद्रकांत वंजारी ,संतोष राजपूत ,संदीप इंगळे ,

Web Title: ‘Prahar’ also drew attention to the water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.