भुसावळ येथे माळी समाज मंडळातर्फे गुणगौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 08:10 PM2019-08-04T20:10:02+5:302019-08-04T20:11:43+5:30
भुसावळ येथे माळी समाज मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार व समाजभूषण सत्कार सोहळा रविवारी माळी भवनात झाला.
भुसावळ, जि.जळगाव : येथे माळी समाज मंडळातर्फे श्री.संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त गुणवंत विद्यार्थी सत्कार व समाजभूषण सत्कार सोहळा रविवारी माळी भवनात झाला. समाजाचे माजी अध्यक्ष एस.एन. पाटील अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाचे उद्घाटन आयएएस अधिकारी मनोज महाजन यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी त्याच्या हस्ते वृक्षारोपणसुद्धा करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जामनेरचे नगरसेवक व गटनेता महेंद्र बाविस्कर, बोदवड उपनगराध्यक्ष दिनेश माळी, समाजाचे अध्यक्ष कैलास महाजन, जि.प.चे माजी सदस्य वसंतराव झारखंडे, नंदू पाटील, वेरुळकर, आबा माळी, कृष्णा माळी, देवमन रासकर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने करण्यात आली. माळी समाजाचे सचिव गजेंद्र महाजन यांनी मंडळाचा अहवाल सादर केला तर समाजाचे अध्यक्ष कैलास महाजन यांनी समाजाच्या प्रगती आणि तरुणांना उद्योगाकडे वळण्याचे आवाहन केले.
आर.बी.महाजन यांना शासनातर्फे उत्कृष्ट निदेशक म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.
समाजभूषण पुरस्कार शैलेश माळी व विजय वानखेडे यांना प्रदान करण्यात आला व डी.एन.महाजन यांच्या विशेष सत्कार करण्यात आला. जे समाज बांधव या वर्षी विविध विभागातून सेवानिवृत्त झाले त्यांचा सत्कार करण्यात आला.
ज्या समाज बांधवांनी समाजाच्या प्रगतीसाठी कार्य केले त्यांच्या पत्नींचासुद्धा सत्कार करण्यात आला. यात जयवंता माळी, मंजुळा सुखदेव बंड, ज्योती महाजन, लता माळी, कमला पाटील यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
माळी समाज मंदिराला विशेष आर्थिक सहकार्य केल्याबद्दल देवराम महाजन यांचा सत्कार करण्यात आला. नंतर प्रावीण्य प्राप्त गुणवंतांचा सत्कार करण्यात येवून प्रशस्तीपत्र व रोख बक्षिसे देण्यात आली.
यावेळी उद्घाटक मनोज महाजन यांनी बोलताना समाजाच्या जडणघडणीत युवकांचे फार मोठे योगदान आहे व युवकांनी स्पर्धा परीक्षेत मेहनत करून यश मिळविण्याचे आवाहन केले. भावी जीवन जगत असताना स्पर्धेत आपण टिकण्यासाठी प्रयत्न करावे यासाठी शुभेच्छा दिल्या.
सूत्रसंचालन धनंजय महाजन यांनी, तर आभार कैलास बंड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुरेश महाजन, शैलेश माळी, सुधाकर महाजन, विजय मानूरकर, दिलीप माळी, योगेश महाजन, दशरथ सोनवणे, कृष्णा माळी, रामकृष्णा माळी, ईश्वर चौधरी, शशिकांत माळी, विजय वानखेडे, डी.एन. महाजन, रमेश महाजन, सुरेश महाजन, प्रवीण चवरे, संजय महाजन, मानूरकर, प्रशांत महाजन, चंद्रशेखर वाघमारे व मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.