रावेर येथे महाराजा अग्रसेन जयंतीनिमित्त गुणगौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 04:00 PM2019-10-01T16:00:46+5:302019-10-01T16:00:55+5:30

व्यापार व उद्योग क्षेत्राच्या चाकोरीतून बाहेर पडून समाजातील युवकांनी केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांची कास धरून प्रशासनात अग्रेसर असण्याची व समाजातील विषमतेची दरी संपुष्टात आणण्यासाठी लग्न समारंभातील अनिष्ट प्रथा व बडेजावपणा थांबवण्याची काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मुंबई येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता दिनेश अग्रवाल यांनी येथे केले.

Praise to Maharaja Agarsen's birth anniversary at Raver | रावेर येथे महाराजा अग्रसेन जयंतीनिमित्त गुणगौरव

रावेर येथे महाराजा अग्रसेन जयंतीनिमित्त गुणगौरव

googlenewsNext
ठळक मुद्देस्पर्धा परीक्षांची कास धरून समाजातील विषमतेची दरी घालवण्यासाठी लग्न समारंभातील बडेजावपणा थांबवा

रावेर, जि.जळगाव : व्यापार व उद्योग क्षेत्राच्या चाकोरीतून बाहेर पडून समाजातील युवकांनी केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांची कास धरून प्रशासनात अग्रेसर असण्याची व समाजातील विषमतेची दरी संपुष्टात आणण्यासाठी लग्न समारंभातील अनिष्ट प्रथा व बडेजावपणा थांबवण्याची काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मुंबई येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता दिनेश अग्रवाल यांनी येथे केले. महाराजा अग्रसेन महाराज जयंतीनिमित्त आयोजित गौरव समारंभात ते बोलत होते.
प्रारंभी सकाळी शहरातील महाराजा अग्रसेन चौकात समस्त अग्रवाल समाज कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्ष संतोष अग्रवाल यांच्या हस्ते अग्रसेन स्तंभपूजन करण्यात आले.
सायंकाळी महाराजा अग्रसेन चौकात मुंबई येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता दिनेश अग्रवाल व अ.भा.अग्रवाल संमेलनाचे प्रचारक नंदकिशोर अग्रवाल यांच्या हस्ते महाराजा अग्रसेन महाराजांच्या पालखीतील प्रतिमेचे पूजन करून पालखीची चित्ताकर्षक विद्युत रोषणाईत व अग्रवाल समाजातील महिलांच्या लक्षणीय उपस्थितीत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
अग्रसेन भवनात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता दिनेश अग्रवाल, नंदकिशोर अग्रवाल, उद्योजक दिलीप अग्रवाल, श्रीराम अग्रवाल, राजेंद्र अग्रवाल आदी मान्यवरांचे हस्ते गुणवंत विद्यार्थी व समाज भूषणांचा गौरव करण्यात आला.
प्रास्ताविक समाज अध्यक्ष संजय अग्रवाल यांनी केले. दरम्यान, अ भा अग्रवाल समाज संमेलनाचे प्रचारक नंदकिशोर अग्रवाल यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन व आभार राजेश अग्रवाल यांनी केले. या कार्यक्रमाला नगरसेविका संगीता अग्रवाल, माजी नगरसेवक अनिल अग्रवाल, जिल्हा अग्रवाल समाज संमेलनाचे सुनील अग्रवाल, विशाल अग्रवाल, रावेर शिक्षण संवर्धक संघाचे संचालक कन्हैयालाल अग्रवाल, अग्रवाल समाज कार्यकारी मंडळाचे शैलेंद्र अग्रवाल, गोविंद अग्रवाल, जे.पी.अग्रवाल, सूर्यकांत अग्रवाल, अतुल अग्रवाल, सतीश अग्रवाल, प्रकाश अग्रवाल, अर्पीत अग्रवाल, रोहित अग्रवाल आदींंनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Web Title: Praise to Maharaja Agarsen's birth anniversary at Raver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.