नशिराबाद न्यू इंग्लिश स्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:15 AM2021-02-15T04:15:11+5:302021-02-15T04:15:11+5:30
या गुण गौरव समारंभाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे उपाध्यक्ष जनार्दन माळी होते. तसेच कार्यक्रमाला संस्थेचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, सचिव मधुकर ...
या गुण गौरव समारंभाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे उपाध्यक्ष जनार्दन माळी होते. तसेच कार्यक्रमाला संस्थेचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, सचिव मधुकर चौबे, संचालिका प्रमिला महाजन, संचालक राजेश पाटील, विनायक वाणी उपस्थित होते. यावेळी संस्थे कडे दानशूर दात्यांनी ठेवलेल्या ठेवीच्या व्याजातून व अन्य दानशूर व्यक्ती नी दिलेल्या रोख रकमेतून इयत्ता दहावीत व बारावीत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले. याच कार्यक्रमात किमान कौशल्य विभागातील अकौंटिंग ऑडिटिंग ट्रेडचे प्रा. व्ही. बी. कोष्टी सेवानिवृत्त झाल्याबद्दल व तसेच शाळेतील कला शिक्षक श्याम कुमावत यांना महाकवी कालीदास राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल या दोघांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रा. व्ही. कोष्टी यांनी मनोगत व्यक्त केले. जनार्दन माळी यांनी अध्यक्षीय भाषण दिले. या कार्यक्रमाला गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक, शाळेचे मुख्याध्यापक एम. डी. तायडे, उपमुख्याध्यापक सी. बी. अहिरे, पर्यवेक्षक बी. आर. खंडारे, सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सभा संमेलन समीतीतील एस. बी. रत्नपारखे यांनी सूत्रसंचालन केले. आर. एल. पाचपांडे, आर. के. जोशी, टी. टी. सोनवणे यांनी परिश्रम घेतले.