फैजपूर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 06:07 PM2019-08-04T18:07:05+5:302019-08-04T18:10:13+5:30
फैजपूर येथील सातपुडा अर्बन क्रेडिट को-आॅपरेटिव्ह संस्थेतर्फे वार्षिक सभेत रविवारी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : येथील सातपुडा अर्बन क्रेडिट को-आॅपरेटिव्ह संस्थेतर्फे वार्षिक सभेत रविवारी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारार्थी विद्यार्थ्यांना यावेळी रोख बक्षीस व पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी चेअरमन नरेंद्र नारखेडे होते.
यावर्षी संस्थेच्या सभासदांना १० टक्के लाभांश देण्याचा निर्णय करण्यात आला. विषयपत्रिकेवरील सर्व विषय यावेळी सवार्नुमते एकमताने मंजूर करण्यात आल. संस्थेचा आलेख हा गेल्या ३३ वर्षांपासून उंचावलेला आहे. प्रास्ताविक व संस्थेच्या आर्थिक आढावा चेअरमन नरेंद्र नारखेडे यांनी सभासदांसमोर सादर केला.
यावेळी व्हाईस चेअरमन चंद्रशेखर चौधरी, संचालक पांडुरंग सराफ, डॉ.पद्माकर पाटील, गिरीश पाटील, जयप्रकाश चौधरी, वासंती चौधरी, नयना चौधरी, सुनील वाढे, विजयकुमार परदेशी , अनिल नारखेडे, केतन किरंगे, रामभाऊ पाचपांडे, आर.के.कोलते, ‘मधुकर’च्या कामगार संघटनेचे अध्यक्ष किरण चौधरी, डॉ.प्रमोद पाटील, डॉ.जी.एस.वर्मा, हर्षल महाजन यांच्यासह गुणवंत विद्यार्थी व पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन व्यवस्थापक राजेश कानडे यांनी केले. सहाय्यक व्यवस्थापक काशिनाथ वारके, रमेश बढे, वसुली प्रतिनिधी विजय सावकारे यांनी परिश्रम घेतले.