पाचोरा येथे वाणी युवा मंचतर्फे गुणगौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 09:25 PM2019-07-24T21:25:20+5:302019-07-24T21:26:14+5:30

महाराष्ट्र वाणी युवा मंचमार्फत वाणी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, कन्यारत्नप्राप्त दाम्पत्यांचा सत्कार व पालकांसाठी प्रा.राजेंद्र चिंचोले यांचे करिअर मार्गदर्शन व करियर शंका समाधानाचा कार्यक्रम झाला.

Praise by the Vani Youth Forum at Panchora | पाचोरा येथे वाणी युवा मंचतर्फे गुणगौरव

पाचोरा येथे वाणी युवा मंचतर्फे गुणगौरव

googlenewsNext
ठळक मुद्देकन्यारत्न प्राप्त दाम्पत्यांचा सत्कारपालकांसाठी करिअर मार्गदर्शन

पाचोरा, जि.जळगाव : महाराष्ट्र वाणी युवा मंचमार्फत वाणी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, कन्यारत्नप्राप्त दाम्पत्यांचा सत्कार व पालकांसाठी प्रा.राजेंद्र चिंचोले यांचे करिअर मार्गदर्शन व करियर शंका समाधानाचा कार्यक्रम झाला. उपनगराध्यक्ष शरद पाटे अध्यक्षस्थानी होते.
राजीव गांधी टाऊन हॉलच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन चाळीसगाव येथील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.विनोद कोतकर यांनी केले. जळगावचे उपवनसंरक्षक प्रकाश मोराणकर, डोंबिवलीचे राजेंद्र सिनकर, प्रा.राजेंद्र चिंचोले, अजित कुडे, डॉ.शरद वाणी, प्रा.डी.पी.वाणी, व्यंकटेश वाणी, अशोक वाणी, ज्ञानेश्वर कोतकर, चंद्रकांत कोतकर, संजय वाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्ह्यातून दहावी सीबीएससी माध्यमातून प्रथम आलेल्या यश ज्ञानेश्वर कोतकर व नाशिक येथे गुन्हेगारी निर्मूलनात विशेष कामगिरी बजाविणारे दीपक वाणी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ज्ञानेश्वर कोतकर व सचिन येवले यांचा सत्कार करण्यात आला. दहावी, बारावी, पदवी व स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविणाऱ्या ८५ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
उपस्थित विद्यार्थ्यांना व पालकांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा.राजेंद्र चिंचोले यांनी करिअर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी स्वत:ची क्षमता, आवड ओळखून करिअर निवडावे, असा सल्ला प्रा.चिंचोले यांनी दिला. डॉ.विनोद कोतकर यांनी आईचे महत्व सांगून विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमतांचा वापर करून यशोशिखर गाठावे, अशा शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शरद पाटे, प्रकाश मोराणकर, अजित कुडे, राजेंद्र सिनकर, डॉ.शरद वाणी, प्रा.डी.पी. वाणी, व्यंकटेश वाणी यांची भाषणे झाली.
प्रास्ताविक युवा मंचचे अध्यक्ष संदीप महालपुरे यांनी केले. याप्रसंगी विजय सोनजे, विशाल ब्राह्मणकार, अशोक बागड, सुनील कोतकर, योगेश शेंडे, प्रा.लक्ष्मण शिनकर, रमेश महालपुरे, प्रवीण शेंडे, प्रकाश येवले , किरण अमृतकर, गणेश सिनकर, महेंद्र महालपुरे, संदीप शिनकर, विवेक ब्राह्मणकर, हर्षल माकडे व सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
या कार्यक्रमात विवेकानंद मंडळ डोंबिवलीमार्फत गरीब विद्यार्थ्यांना ५० हजार रुपयांची शैक्षणिक मदत देण्यात आली. सूत्रसंचालन चंद्रकांत कोतकर, डी.आर. कोतकर, योगेश शेंडे, प्रा.सिनकर यांनी केले. विजय सोनजे यांनी आभार मानले.

Web Title: Praise by the Vani Youth Forum at Panchora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.