प्रताप हरि पाटील यांनी उमटविला ठसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 04:07 PM2018-12-17T16:07:10+5:302018-12-17T16:07:14+5:30
कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील यांचे सुपूत्र प्रताप हरि पाटील यांनी आपल्या कर्तृत्वाने भडगावच नव्हेतर सबंध जळगाव जिल्हयात आपल्या कार्याची मोहोर उमटवली आहे.
अशोक परदेशी
भडगाव : कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील यांचे सुपूत्र प्रताप हरि पाटील यांनी आपल्या कर्तृत्वाने भडगावच नव्हेतर सबंध जळगाव जिल्हयात आपल्या कार्याची मोहोर उमटवली आहे.
हरि पाटील यांनी किसान शिक्षण संस्थेची भडगाव तालुक्यात सन १९६२ साली स्थापना केली. त्यानंतर १९९९ पासून संस्थेच्या चेअरमन पदाची धुरा प्रताप हरि पाटील हे सांभाळत आहे. त्यांनी वडीलांकडून समाजसेवेचा वारसा घेऊन संस्थेची यशस्वी घौडदौड सुरू ठेवलेली आहे. आज संस्थेच्या ११ माध्यमिक शाळा, ४ कनिष्ठ महाविद्यालये, २ खाजगी प्राथमिक शाळा, अध्यापक विद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय, चार इंग्रजी माध्यमाच्या शाळा यशस्वी ज्ञानदानाचे काम करत आहे. त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेत त्यांना अनेक सामाजिक संस्थांनी विविध पुरस्कार देऊन सन्मानित केलेले आहे.
त्यांनी आपल्या राजकीय जीवनात विविध पदे यशस्वीपणे सांभाळली आहेत त्यात विद्यमान अध्यक्ष भडगाव तालुका खरेदी-विक्री संघ, चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी आमडदे, सरपंच ग्रामपंचायत आमडदे, माजी सभापती पाचोरा भडगाव कृषी उत्पन्न बाजार समिती, माजी जि.प.सदस्य जि.प.जळगाव अशा विविध पदावर त्यांनी काम केले आहे. आमडदे ग्रामपंचायतीत सलग पाचव्यांदा सरपंचपद ते भूषवित आहेत.