राष्ट्रीय स्पर्धेत प्रताप उत्तेजनार्थ तर विद्यापीठस्तरीय स्पर्धेत प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 03:12 PM2020-02-02T15:12:29+5:302020-02-02T15:12:43+5:30
राष्ट्रीय स्तरावरील प्रश्नमंजूषा, प्रोजेक्ट व भित्तीचित्र स्पर्धेत पाच राज्यातून प्रताप महाविद्यालयाला उत्तेजनार्थ तर विद्यापीठस्तरीय पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन स्पर्धेत रसायनशास्र विषयात प्रथम, तर संख्याशास्त्र विषयात मंजूषा द्वितीय क्रमांक मिळाला आहे.
अमळनेर, जि.जळगाव : राष्ट्रीय स्तरावरील प्रश्नमंजूषा, प्रोजेक्ट व भित्तीचित्र स्पर्धेत पाच राज्यातून प्रताप महाविद्यालयाला उत्तेजनार्थ तर विद्यापीठस्तरीय पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन स्पर्धेत रसायनशास्र विषयात प्रथम, तर संख्याशास्त्र विषयात मंजूषा द्वितीय क्रमांक मिळाला आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्तरावर जळगाव येथील शास्र, तंत्रज्ञान व संशोधन पदव्युत्तर महाविद्यालयात पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी आयोजित पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशन स्पर्धेत रसायनशास्र, गणित, संख्याशास्त्र, लाईफ सायन्स या चार विषयांवर आयोजित स्पर्धेत एकूण ३८ महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. त्यात रसायनशास्र विषयात ऋषिकेश पाटील प्रथम, तर संख्याशास्र विषयात मंजूषा पाटील द्वितीय आले आहेत. त्यांना रसायनशास्र विभागप्रमुख पी.आर.शिरोडे व संख्याशास्त्र विभागप्रमुख जे.बी.जैन यांनी मार्गदर्शन केले. विजेत्या विद्यार्थ्यांचे चेअरमन प्रदीप अग्रवाल, प्राचार्या ज्योती राणे व संचालकांनी कौतुक केले आहे
तसेच राष्ट्रीय स्तरावर झालेल्या पुणे येथील विश्वकर्मा विद्यापीठातर्फे आयोजित प्रश्नमंजूषा, भित्तिचित्रे व प्रोजेक्ट स्पर्धेत महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, आंध्रप्रदेश राज्याच्या २०० प्रतिनिधींनी सहभाग घेतला. प्रताप महाविद्यालयाच्या संख्याशास्र विषयातील एस.वाय.बी.एस्सी.चे मोहित अहिरराव, भूषण गांगुर्डे, सौरभ चौधरी या गटाला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. त्यांना प्राचार्या डॉज्योती राणे व प्रा.जे.बी.जैन यांचे मार्गदर्शन लाभले.