अनाथ मुलीच्या विवाहासाठी लोकप्रतिनिधी, अधिकारी बनले काका, मामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2017 01:36 PM2017-04-23T13:36:46+5:302017-04-23T13:36:46+5:30

थोर समाजसेवक शंकरबाबा पापळकर (वङझर, जि.अमरावती) यांची मानसकन्या मंगल हीचा विवाह येत्या 30 रोजी रावेर येथील योगेश देवीदास जैन यांच्यासोबत शहरातील खान्देश सेंट्रल येथे सायंकाळी सहा वाजता होणार आहे

Pratapinidhi for the orphan girl's marriage, became the officer, uncle, mama | अनाथ मुलीच्या विवाहासाठी लोकप्रतिनिधी, अधिकारी बनले काका, मामा

अनाथ मुलीच्या विवाहासाठी लोकप्रतिनिधी, अधिकारी बनले काका, मामा

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

जळगाव, दि. 23 -  थोर समाजसेवक शंकरबाबा पापळकर (वङझर, जि.अमरावती) यांची मानसकन्या मंगल हीचा विवाह येत्या 30 रोजी रावेर येथील योगेश देवीदास जैन यांच्यासोबत शहरातील खान्देश सेंट्रल येथे सायंकाळी सहा वाजता होणार आहे. या विवाह सोहळ्य़ासाठी मंत्री, माजी मंत्री, महापौर, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक हे या अनाथ मुलीचे काका, मामा झाले आहेत.
मंगल व योगेश हे दोन्ही मूकबधीर आहे. मंगल ही शिर्डी येथील साईबाबा मंदिरात अनाथ म्हणून सापडली होती. तिचा विवाह सोहळा हा एक राष्ट्रीय महोत्सव म्हणून साजरा व्हावा यासाठी रोटरी क्लब  वेस्टचे प्रय} आहेत. जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे यावेळी   कन्यादान करतील. मुलीचे  मामा म्हणून महापौर नितीन लढ्ढा, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर व पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर असतील. मंगलचे काका म्हणून माजी मंत्री सुरेशदादा जैन व माजी महापौर रमेशदादा जैन हे राहणार आहे.
दरम्यान, मंगल हिच्या विवाहानिमित्त जळगाव शहरातील मायादेवीनगरमधील रोटरी हॉलमध्ये तिला बांगडय़ा, साडी देऊन तिचे  औक्षण करण्यात आले. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Pratapinidhi for the orphan girl's marriage, became the officer, uncle, mama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.