प्रतापराव पाटील यांनी नाकारली पदोन्नती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:16 AM2021-09-25T04:16:48+5:302021-09-25T04:16:48+5:30
जळगाव : जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांना औरंगाबाद येथील मानव विकास आयुक्तालय येथे उपायुक्त पदावर पदोन्नती मिळाली होती. ...
जळगाव : जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांना औरंगाबाद येथील मानव विकास आयुक्तालय येथे उपायुक्त पदावर पदोन्नती मिळाली होती. ही पदोन्नती प्रतापराव पाटील यांनी नाकारली आहे. सध्या कौटुंबिक जबाबदारी वाढली आहे तसेच जळगावला जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून काम करण्यास जास्त वाव असल्याचे पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
प्रतापराव पाटील यांनी सांगितले की, दोन वर्षे उशिराने ही पदोन्नती मिळत आहे. याचवेळी काही कौटुंबिक जबाबदाऱ्या असल्यानेदेखील हे पद नाकारले आहे. याआधी नाशिकला जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) या पदावर असताना तसेच उपायुक्त नियोजन या पदाचा अतिरिक्त कार्यभारदेखील होता. त्यावेळी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांविरोधात आलेल्या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश आयुक्त महेश झगडे यांनी दिले होते. त्यानंतर चौकशीमुळे तत्कालीन जिल्हाधिकारी, नाशिक यांनी दोन वर्षांचे गोपनीय अहवाल लिहिले नव्हते. त्यावेळी कनिष्ठ सहकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. आता पदोन्नती मिळाली, मात्र वैयक्तिक जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. तसेच पदोन्नतीतील पदापेक्षा सध्या आहे त्या पदावर काम करून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी जास्त वाव आहे. त्यामुळे ही पदोन्नती नाकारली असल्याचेही पाटील यांनी सांगितले.