शिंदे गटाचे अमळनेर तालुकाप्रमुख प्रथमेश पवारांवर दरोड्याचा गुन्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2023 02:49 PM2023-01-11T14:49:26+5:302023-01-11T14:50:31+5:30

बजाज फायनान्सचं कार्यालय फोडणे भोवलं

prathamesh pawar head of amalner taluka of Shinde group has been charged with robbery | शिंदे गटाचे अमळनेर तालुकाप्रमुख प्रथमेश पवारांवर दरोड्याचा गुन्हा!

शिंदे गटाचे अमळनेर तालुकाप्रमुख प्रथमेश पवारांवर दरोड्याचा गुन्हा!

googlenewsNext

अमळनेर, जि. जळगाव

बजाज फायनान्सचे कार्यालय फोडून ८६ हजार ३९० रुपये आणि हिशोबाची चिठ्ठी काढून नेणाऱ्या बाळासाहेबांची शिवसेना तालुका प्रमुख व दोघांसह पाच ते सहा जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

बाळासाहेबांची शिवसेना तालुका प्रमुख प्रथमेश पवार यांच्या आई सुरेखाबाई मधुकर पवार (रा. ढेकू रोड, अमळनेर) यांनी बजाज फायनान्स अमळनेर शाखेकडून ४ लाख २७ हजार रुपये कर्ज घेतले होते. त्याचा हप्ता दरमहा भरण्याचे ठरले असताना डिसेंबर महिन्याचा हप्ता खात्यात रक्कम शिल्लक नसल्याने ऑनलाईन हप्ता बाऊन्स झाला. म्हणून ललित सूर्यवंशी, जयेश कदम हे कर्मचारी ईएमआय रक्कम घ्यायला गेले असता प्रथमेश पवार याने १० रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत देतो असे सांगितल्याने कर्मचारी परत आले होते. १० रोजी सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास प्रथमेश पवार, सनी सुरेंद्र अभंगे व सचिन सुरेंद्र अभंगे दोन्ही (रा. चोपडा नाका, अमळनेर) यांच्यासह पाच ते सहा तरुण महाराणा प्रताप चौक न्यू प्लॉट येथील बजाज फायनान्स कार्यालयात घुसले व शिविगाळ करत हातातील लाकडी दंडक्याने खुर्च्या ,लॅपटॉप ,संगणक असे साहित्याची तोडफोड सुरू केली.  

तसेच ड्रॉवर मधील बाऊन्स व ऍडव्हान्स हप्त्याची ठेवलेले ९६ हजार १४५ रुपयांपैकी ८६ हजार ३९० रुपये आणि हिशोबाची चिट्ठी काढून घेतली. आणि माझ्या घरी वसुलीला आले तर पाहून घेईल अशी धमकी देऊन कपाट, कुलर, व्हीलचेअर, सीसीटीव्ही कॅमेरे असे दोन अडीच लाखाचे नुकसान केले. बजाज फायनान्स चे अधिकाऱ्यांनी फिर्याद दिल्यावरून दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे करीत आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: prathamesh pawar head of amalner taluka of Shinde group has been charged with robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.