प्रवीण चव्हाण यांच्या जामिनावर सोमवारी सुनावणी, पुनर्विलोकन अर्ज फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 07:51 PM2023-03-10T19:51:53+5:302023-03-10T19:52:31+5:30
कुंदन पाटील जळगाव : फसवणुक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या ॲड.प्रवीण चव्हाण यांच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे. दरम्यान, ...
कुंदन पाटील
जळगाव : फसवणुक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या ॲड.प्रवीण चव्हाण यांच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे. दरम्यान, खंडणीच्या गुन्ह्यात पोलीस कोठडी मिळावी, यासाठी सरकारी पक्षाने दाखल केलेला पुनर्विलोकन अर्ज फेटाळण्यात आला आहे.
फसवणुकीच्या गुन्ह्यात ॲड.चव्हाण यांना दि.२६ फेब्रुवारी रोजी त्यांना अटक करण्यात आली होती. चव्हाण यांना तपासकामी पोलीस कोठडी मिळावी, यासाठी सत्र न्यायालयात पुनर्विलोकन अर्ज सादर केला होता.चव्हाण यांच्या जामिनासाबेतच पुनर्विलोकन अर्जावर गेल्या आठवडाभरापासून सुनावणी लांबली होती. शुक्रवारी न्यायालयाने पुनर्विलोकन अर्जावर सुनावणी केली. त्यानुसार खंडणीच्या गुन्ह्यात जामीन मिळालेल्या ॲड.चव्हाण यांना पोलीस कोठडी मिळावी, असा सरकारी पक्षाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. मात्र ॲड.चव्हाण यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होऊ शकलेली नाही.