भारतीय सैन्य दलातून प्रवीण पारिस्कर सेवानिवृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:16 AM2021-07-30T04:16:21+5:302021-07-30T04:16:21+5:30

पारिस्कर यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत १ ऑगस्ट २००४ साली सैन्यदलात भरती झाले. वर्षभर नगर येथील आर्मी ...

Praveen Pariskar retires from the Indian Army | भारतीय सैन्य दलातून प्रवीण पारिस्कर सेवानिवृत्त

भारतीय सैन्य दलातून प्रवीण पारिस्कर सेवानिवृत्त

Next

पारिस्कर यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत १ ऑगस्ट २००४ साली सैन्यदलात भरती झाले. वर्षभर नगर येथील आर्मी ट्रेनिंग स्कूलमध्ये सैन्यदलाचे ट्रेनिंग पूर्ण केले. यानंतर पारिस्कर यांना १३ आर्मी रेजिं.पटीयाला या ठिकाणी पोस्टींग मिळाली. त्यानंतर ऑटोइन्सस्टर(नगर), बबिना, गंगागर, २७ राष्ट्रीय राइफल जम्मू -कश्मीर व त्यानंतर हिसार या अश्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी आपली सलग अठरा वर्षांची सेवा बजाविली आहे. त्यांचे १२ वी आय.टी.आय.पर्यंतचे शिक्षण गावाकडे झालेले आहे.

दरम्यान पारिस्कर यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशी १ ऑगस्ट रोजी मित्रपरिवाराकडून गावातील मुख्य चौकापासून स्वागत मिरवणूक काढली जाणार आहे. या दरम्यान पारिस्कर गावातील मंदिरामध्ये जाऊन देवदर्शन घेणार आहेत, तसेच स्वागत मिरवणूक मार्गात लागणाऱ्या महापुरुषांच्या फलकाचेही दर्शन घेणार आहे. सेवानिवृत्त झालेल्या सैनिकाची गावात पहिल्यांदाच अशी स्वागत मिरवणूक काढली जाणार आहे, हे विशेष आहे.

Web Title: Praveen Pariskar retires from the Indian Army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.