कोरोनामुक्तीसाठी केली प्रार्थना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:16 AM2021-05-13T04:16:33+5:302021-05-13T04:16:33+5:30
जळगाव : बोहरा समाज बांधवांचे रमजान महिन्यातील रोजे संपल्यानंतर बुधवारी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बोहरा समाज ...
जळगाव : बोहरा समाज बांधवांचे रमजान महिन्यातील रोजे संपल्यानंतर बुधवारी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बोहरा समाज बांधवांनी त्यांच्या घरी ईदची नमाज अदा केली. या वेळी देशासह जगाला कोरोनामुक्तीसाठी तसेच देशाच्या प्रगतीसाठी प्रार्थना करण्यात आली. नमाजनंतर समाजबांधवांनी एकमेकांना मोबाईल व सोशल मीडियाच्या माध्यमातून ईदच्या शुभेच्छा दिल्या.
मंगळवारी बोहरा समाजातील ३० दिवसाचे रोजे पूर्ण झाले. कोरोना साथीमुळे बोहरा समाज बांधवांनी घरी राहून नमाज अदा केली. बोहरा समाजातील ५३ वे धर्मगुरु सैयदना अली कदर मुफद्दल सैफुद्दीन साहेब यांच्यामार्फत ३० दिवस सुरू असलेल्या मजलिसच्या थेट प्रक्षेपणाचा घराघरात लाभ घेतला. धर्मगुरुंमार्फत ऑनलाईन सेमिनारचे आयोजनही करण्यात आले. ज्यामध्ये समाज बांधवांना व्यवसाय, धार्मिक, शिक्षण तसेच आरोग्याविषयी माहिती देण्यात आली. यामुळे समाजाला मोठा लाभ झाल्याने समाजबांधवांनी सांगितले.
बोहरा समाजाचे अध्यक्ष आमिल सेफुद्दीन अमरावतीवाला, सचिव मोईज लेहरी, खजिनदार युसुफ मकरा, सहसचिव मोईज झेनीत, तयाब मास्टर, मुर्तुजा इज्जी व अंजुमन ए हुसेनी कमेटीचे सर्व सदस्यांनी बोहरा समाजाचे २८० घरातील व्यक्तींसोबत नियमित दूरध्वनीद्वारे संपर्कात राहत त्यांना येणाऱ्या अडचणी दूर केल्या. दररोज दोन- तीन तास बोहरा समाजाबाबत धार्मिक माहिती व कुराण पठण करण्यात आले. सर्व बोहरा समाजबांधवांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना पगार देणे व इतर बाबतीत कामगारांना सहकार्य करावे, असे आवाहन समाजाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले.