केरळमधील पूरग्रस्तांसाठी केली मुस्लीम बांधवांनी प्रार्थना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 05:08 PM2018-08-22T17:08:55+5:302018-08-22T17:15:25+5:30

ईद - उल- अझहा अर्थात बकरी ईद बुधवारी शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी मुस्लीम बांधवांनी केरळमधील पूरग्रस्तांच्या सुरक्षिततेसाठी तसेच जगात शातंता नांदावी, विकास व्हावा, आवश्यक त्या ठिकाणी पाऊस पडून दुष्काळ दूर व्हावा, अशी प्रार्थना केली.

Prayers from Muslim brothers for flood victims in Kerala | केरळमधील पूरग्रस्तांसाठी केली मुस्लीम बांधवांनी प्रार्थना

केरळमधील पूरग्रस्तांसाठी केली मुस्लीम बांधवांनी प्रार्थना

Next
ठळक मुद्देजळगावात बकरी ईद उत्साहात साजरीहिंदू व मुस्लीम बांधवांनी दिल्या एकमेकांना शुभेच्छाविश्वशांतीसाठी केली प्रार्थना

जळगाव : ईद - उल- अझहा अर्थात बकरी ईद बुधवारी शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी मुस्लीम बांधवांनी केरळमधील पूरग्रस्तांच्या सुरक्षिततेसाठी तसेच जगात शातंता नांदावी, विकास व्हावा, आवश्यक त्या ठिकाणी पाऊस पडून दुष्काळ दूर व्हावा, अशी प्रार्थना केली. या वेळी हिंदू-मुस्लीम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
शहरातील अजिंठा चौक येथील मुस्लीम कब्रस्तान व रुहते हिलाल कमिटीतर्फे ईदगाह मैदानावर सकाळी साडेआठ वाजता मौलाना उस्मान कासमी यांनी ईदची नमाज पठण केली. त्यानंतर विश्वशांतीसाठी व पावसासाठी प्रार्थना करून ज्या ठिकाणी जास्त पाऊस होत आहे त्याठिकाणी रहेम कर व ज्या ठिकाणी पाऊस नाही त्या ठिकाणी सुद्धा कृपा दृष्टी राहू दे, अशी प्रार्थना केली. सर्वप्रथम मौलाना नासीर यांनी नमाजची पद्धत विषद केली.
नियाज अली नगर येथील सुन्नी ईदगाह ट्रस्टच्या मैदानावर नमाज पठण करण्यात आले. मौलाना जाबीर रजा यांच्या नेतृत्वात ही नमाज अदा करण्यात आली. या ठिकाणीदेखील केरळमधील पूरग्रस्तांसाठी तसेच विश्वशांती, एकतेसाठी प्रार्थना करण्यात आली.
अजिंठा चौक येथील मुस्लीम कब्रस्तान येथे जमात ए इस्लामी हिंदचे अध्यक्ष इंजिनिअर अल्तमश व असोसिएशन आॅफ इंडियन मुस्लीम स्टुडंटचे अध्यक्ष उमेर शेख यांच्यावतीने केरळमधील पूरग्रस्तांसाठी निधी जमा करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानुसार या ठिकाणी एक लाख रुपये जमा झाले. तसेच नियाजअली नगर येथेदेखील केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी जमा करण्याचे आवाहन करण्यात आले.

Web Title: Prayers from Muslim brothers for flood victims in Kerala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.