पूर्वहंगामी कापूस लागवडीला ‘ब्रेक’

By admin | Published: May 17, 2017 01:54 PM2017-05-17T13:54:21+5:302017-05-17T13:54:21+5:30

तापमान कमी होणार नाही तोर्पयत कुठेही लागवड होणार नसल्याचे चित्र असून

Pre-requisite cotton 'brakes' | पूर्वहंगामी कापूस लागवडीला ‘ब्रेक’

पूर्वहंगामी कापूस लागवडीला ‘ब्रेक’

Next

ऑनलाइन लोकमत

जळगाव, दि. 17 - उष्णता अधिक असल्याने जळगाव जिल्हाभरात अद्याप फक्त 400 हेक्टरवर पूर्वहंगामी (बागायती) कापसाची लागवड झाली आहे. जोर्पयत तापमान कमी होणार नाही तोर्पयत कुठेही लागवड होणार नसल्याचे चित्र असून, यामुळे कापूस बियाणे बाजारपेठेतही फारशी उलाढाल अद्याप सुरू झालेली नाही.
जळगाव जिल्ह्यात कापसाचे सर्वसाधारण क्षेत्र चार लाख 60 हजार हेक्टर आहे. यंदा चार लाख 65 हजार हेक्टरवर लागवड होण्याची अपेक्षा आहे.
पूर्वहंगामी कापूसही वाढणार
यंदा बागायती किंवा पूर्वहंगामी कापसाची तब्बल 80  हजार हेक्टरवर लागवड होईल, असे अपेक्षित आहे. परंतु अधिक उष्णतेमुळे पूर्वहंगामी कापूस लागवडीला ब्रेक लागला आहे.
मुळांची वाढ खुंटते
अधिक उष्णता म्हणजेच तापमान 43 ते 44 अंश सेल्सीअस असले तर कापसाची वाढ अपेक्षित गतीने होत नाही. रोपाच्या पांढ:या मुळ्य़ा कमकुवत होतात. त्यामुळे पिकात आकस्मिक मर रोग फोफावतो. 2012 मध्ये पूर्वहंगामी कापसावर जळगाव, चोपडा, जामनेर, पाचोरा भागात अधिक उष्णतेमुळे आकस्मिक मर रोग आला होता. हा वाईट अनुभव लक्षात घेता यंदाही अद्याप काही भागांचा अपवाद वगळता कापसाची लागवड झालेली नसल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे.
चोपडा, यावल या तालुक्यांमध्ये काही ठिकाणी लागवड झाली आहे. तसेच जळगाव तालुक्यातही तापीकाठावर लागवड झाल्याची माहिती मिळाली.
बियाणे बाजारही थंड
कापूस लागवडीला वेग आलेला                       नसल्याने कापूस बियाणे बाजारातही फारशी उलाढाल सुरू झालेली नाही. विविध कंपन्यांच्या जवळपास चार लाख बीटी कापूस बियाण्यांच्या पाकिटांचा पुरवठा झाला आहे. पण त्यांना उठाव नाही. यातच पुढील आठवडय़ातही उष्णता अधिक राहू शकते, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने आपल्या संकेतस्थावर वर्तविला आहे. एवढय़ा उष्णतेत मजुरही काम करण्यास नकार देत आहेत.
स्वदेशी 5 ची प्रतीक्षा
देशी सुधारित प्रकारातील स्वदेशी 5 या कापूस बियाण्याची कुठलीही आवक अद्याप झालेली नाही. कमी खर्चात अधिक उत्पादन देणा:या या वाणाची प्रतीक्षा शेतक:यांना आहे. अनेक कृत्रीम जलसाठा उपलब्ध असलेले शेतकरी स्वदेशी 5 च्या लागवडीस पसंती देतात. यासह राशी 659 या बीटी कापूस वाणाच्या विक्रीला बंदी आहे. यासंदर्भात कृषी आयुक्तालय, पुणे येथे सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे. आठवडाभरात याबाबतचा निकाल समोर येईल. या वाणाच्या विक्रीला पुन्हा सुरूवात झाली तर त्याची लागवड करू म्हणूनही अनेकांनी अद्याप कापूस लागवड केलेली नसल्याचे चित्र आहे.
तापमानाबाबतचा पुढील काही दिवसांचा अंदाज
17 मे 43.7, 18 मे 43.3, 19 मे 43.9 अंश सेल्सीअस अर्थातच पुढील काळातही उष्णता राहणार असल्याने कापसाची लागवड टाळावी, असा सल्ला कृषी विभागाने जारी केला आहे.

उष्णता अधिक असल्याने सध्या कापूस लागवडीसाठी अनुकूल वातावरण नाही. 25 मे नंतर लागवड करणे योग्य राहील. अद्याप स्वदेशी 5 या कापूस वाणाच्या पुरवठय़ाबाबतचे कुठलाही लक्ष्यांक किंवा पुरवठा वरिष्ठ कार्यालयाने मंजूर केलेला नाही.
-मधुकर चौधरी, कृषी विकास अधिकारी

Web Title: Pre-requisite cotton 'brakes'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.