पूर्वनियोजित परीक्षा होणार ऑनलाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:17 AM2021-02-24T04:17:57+5:302021-02-24T04:17:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत येणारे सर्व महाविद्यालये आणि परिसंस्था पुन्हा एकदा ६ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत येणारे सर्व महाविद्यालये आणि परिसंस्था
पुन्हा एकदा ६ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश विद्यापीठातर्फेे देण्यात आले आहे, तसेच २२ फेब्रुवारी ते ६ मार्च या काळात पूर्वनियोजित ऑनलाइन परीक्षा सुरू ठेवाव्यात, असेही विद्यापीठाने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानंतर विद्यापीठाने हे आदेश पारित केले. राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहायीत विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयातील वर्ग सुरू करण्याबाबत शासनाच्या परिपत्रकानुसार नियमित वर्ग सुरू करण्यास १५ फेब्रुवारीपासून मान्यता देण्यात आली होती; मात्र जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आदेश दिल्यावर पुन्हा एकदा ऑफलाइन वर्ग स्थगित करण्यात आले आहे. आता सर्व वर्ग ६ मार्चपर्यंत पुन्हा ऑनलाइन घेण्यात येणार आहेत.