अवकाळी पावसाचा पुन्हा बसला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 07:23 PM2020-03-27T19:23:17+5:302020-03-27T19:23:23+5:30

पिकांचे नुकसान : काही भागात जोरदार तर काही ठिकाणी लावली तुरळक हजेरी

Precipitation hit again | अवकाळी पावसाचा पुन्हा बसला फटका

अवकाळी पावसाचा पुन्हा बसला फटका

Next


जळगाव : जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी गुरुवारी रात्री व शुक्रवारी दिवसा अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावली. बुधवारी रात्री पडलेल्या पावसाने काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर लगेचच पावसाने कमी- अधिक प्रमाणात पुन्हा हजेरी लावत शेतकऱ्यांचे थोड्या-फार प्रमाणात नुकसान केले आहे.
काही भागात हलक्या सरी कोसळल्या
धरणगाव, पारोळा, अमळनेर, चोपडा, भुसावळ, रावेर, मुक्ताईनगर, तसेच पाचोºयासह सामनेर येथे व परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. यामुळे हवेत गारवा निर्माण झाला. दिवसभर आभ्राच्छादीत वातावरण होते. यामुळे पाऊस पडेल की काय, असो वाटत होते. हा पाऊस गहू, हरभरा व इतर पिकांसाठी हानीकारक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
चाळीसगाव परिसरात जोरदार सलामी
अवकाळी पावसाने परिसरात शुक्रवारी पहाटे व सकाळी पावणे नऊ वाजता पुन्हाजोरदार सलामी दिली. मात्र कृषी विभागाकडे कोणत्याही नुकसानीची नोंद नाही.
गेल्या तीन ते चार दिवसांपासून चाळीसगाव परिसरात ढगाळ हवामान आहे. शुक्रवारी पहाटे तीन वाजता ३० मिनिटे पाऊस झाला. सकाळी पुन्हा नऊ वाजता मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. जवळपास ४५ मि. पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.
दरम्यान वाघडू ता चाळीसगाव परिसरात गहू , हरभरा, मका, बाजरी, ज्वारी ही प्रमुख पिके कापणीवर आलेली असताना शुक्रवारी पहाटे पावसाने हजेरी लावल्याने शेतकºयांचे नुकसान झाले आहे.
उंबरखेडला गहू, बाजरी, मका, हरभरा जमीनदोस्त
उंबरखेड ता.चाळीसगाव : येथे रोजी सायंकाळी तासभर आणि २८ रोजी सकाळी चार वाजता दीड तास विजांच्या कडकडाटात व वादळी वाºयासह जोरदार पावसाने गहू , बाजरी, मका, ज्वारीचे उभे पीक आडवे झाल्याने काढणीवर आलेल्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. पीक आडवे झाल्यामुळे काढणीचे काम जिकिरीचे झाले आहे. नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी शेतकरी वर्गाने केली आहे.
यावल तालुक्यात गहू आणि कांद्याचे नुकसान
यावल शहर व परीसरात गुरूवारी रात्री व शुक्रवारी दुपारी कमी-अधिक प्रमाणात पाउस झाला आहे. या पावसाने गहु, हरभरा, व कांद्याचे काही प्रमाणात नुकसान होणार असल्याचे शेतक-यांमध्ये बोलले जात आहे.
तालुक्यात गुरूवारी रात्री सौखेडा, दहीगाव परीसरात तर शुक्रवारीही तालुक्यात पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.मात्र याबाबत येथील महसुल प्रशासनाकडे कोणतीही नुकसानीची नोद नाही.
भडगाव तालुक्यात अनेक ठिकाणी नुकसान
भडगाव शहरासह तालुक्यात शुक्रवारी सकाळी ढगाळ वातावरणासह विजेच्या कडकडाटात अर्धा ते पाउणतास कमी अधिक प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामळे गहु, हरभरा, मका आदी पिकांची कापणी करुन ठेवल्या पिकांचे नुकसान झाले आहे. हा माल खराब झाला आहे. भातखंडे, गुढे आदी ठिकाणीही अनेक शेतकºयांना फटका बसला आहे.

Web Title: Precipitation hit again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.