पावसाळ््यात कमी पाऊस असलेल्या चाळीसगाव तालुक्यात नोव्हेंबर महिन्यात अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 12:37 PM2019-11-03T12:37:54+5:302019-11-03T12:38:33+5:30
तालुक्यात ६६ मि.मी. पाऊस
जळगाव : भर पावसाळ््यात जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत कमी पर्जन्यमान असलेल्या चाळीसगाव तालुक्यात पावसाळा संपल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. २ नोव्हेंबर रोजी या तालुक्यात ६६ मि.मी. पाऊस झाला तर त्या खालोखाल जामनेर जामनेर तालुक्यात ४४.९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
यंदा २३ दिवस पावसाने उशिरा हजेरी लावली. त्यानंतर पावसाचा जोर कमी-जास्त होत राहिला. मात्र आॅगस्ट महिन्यापासून जिल्हाभरात जोरदार पाऊस सुरू झाला. त्यात इतर तालुक्यांमध्ये पावसाची सरासरी वाढत असताना चाळीसगाव तालुक्यात त्या तुलनेत पाऊस कमीच होता. मात्र सप्टेंबर अखेरीस ती भर निघून या तालुक्याने पावसाची शंभरी गाठली. मात्र पावसाळा संपल्यानंतरही गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरूच असून चाळीसगाव तालुक्यातही त्याचा जोर वाढलेला आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात या तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. २ रोजी ६६ मि.मी. पाऊस झाला असून गिरणा परिसरात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे नद्याही दुथडी भरून वाहत आहे.