बुंदीच्या लाडूतून गर्भवतीला विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 10:38 PM2017-09-28T22:38:19+5:302017-09-28T22:39:57+5:30
सिंधी कॉलनीतील जय जोगनिया या मिठाईच्या दुकानातून खरेदी केलेला बुंदीचा लाडू खाल्ल्याने शबाना मुश्ताक पिंजारी (वय २५रा.तांबापुरा, जळगाव) या गर्भवती महिलेला विषबाधा झाली. त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार केले.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,२८: सिंधी कॉलनीतील जय जोगनिया या मिठाईच्या दुकानातून खरेदी केलेला बुंदीचा लाडू खाल्ल्याने शबाना मुश्ताक पिंजारी (वय २५रा.तांबापुरा, जळगाव) या गर्भवती महिलेला विषबाधा झाली. त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार केले.
दरम्यान, या महिलेचे पती मुश्ताक अन्वर पिंजारी यांनी याबाबत अन्न व औषध विभागाकडे लेखी तक्रार केली. त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी दिलीप सोनवणे यांनी दुकानाची तपासणी केली असता दुकानात बुंदीचे लाडू शिल्लक नव्हते.
पिंजारी यांनी घेतलेले लाडू तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविण्यात आले. त्यात दोष आढळून आला तर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सोनवणे यांनी दिली. दरम्यान, हे प्रकरण दडपण्यासाठी दुकानदाराने पाच हजार रुपये देण्याचे आमिष दाखविल्याचा आरोप पिंजारी यांनी केला.