लसीकरणाकडे गर्भवतींची पाठ, तीन केंद्रांवर अद्याप एकाही महिलेने घेतली नाही लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:12 AM2021-07-18T04:12:25+5:302021-07-18T04:12:25+5:30

आनंद सुरवाडे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गर्भवती महिला तसेच स्तनदा माता यांना आता कोरोना प्रतिबंधक लस घेण्यात येणार ...

Pregnant back to vaccination, no woman has yet been vaccinated at the three centers | लसीकरणाकडे गर्भवतींची पाठ, तीन केंद्रांवर अद्याप एकाही महिलेने घेतली नाही लस

लसीकरणाकडे गर्भवतींची पाठ, तीन केंद्रांवर अद्याप एकाही महिलेने घेतली नाही लस

googlenewsNext

आनंद सुरवाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गर्भवती महिला तसेच स्तनदा माता यांना आता कोरोना प्रतिबंधक लस घेण्यात येणार आहे. केंद्राकडून तशा मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहेत. मात्र, अद्याप शहरात एकाही गर्भवती महिलेने कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली नसून तशी कुठलीच स्वतंत्र नोंदणी प्रशासनाकडे नाही. आता शासनाच्या सूचनेनुसार जिल्हाभरात प्रशिक्षणानंतर स्वतंत्र नोंदणी करण्यात येणार असल्याचे लसीकरण अधिकारी समाधान वाघ यांनी सांगितले.

गर्भवती महिला अद्यापही भीतीपोटी लसीकरणासाठी पुढे येत नाही. यात काही स्तनदा मातांनी लस घेतल्याचे डॉ. वाघ यांनी सांगितले मात्र, अद्याप गर्भवती महिलांनी लस घेतलेली नसल्याचे ते म्हणाले. मात्र, लवरात लवकर लसीकरण पूर्ण करून घेतल्यानंतरच आपण सुरक्षित राहू शकतो, असेही यंत्रणेचे म्हणणे आहे. जिल्हाभरात लसीकरण मोहीम गतिमान पद्धतीने राबविली जात आहे. त्यातच लसींच्या तुटवड्यामुळे या मोहिमेला खीळ बसली आहे. त्यातच गर्भवती महिला व स्तनदा मातांची संख्याही मोठी असताना या गटाचे लसीकरण पूर्ण करण्याचे एक आव्हान जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेपुढे राहणार आहे.

तीन लसीकरण केंद्रांवरची माहिती

१ छत्रपती शाहू महाराज रुग्णालय

महिला

: १०१३४

पुरुष

: १२,४१४

२ डी. बी. जैन रुग्णालय

महिला

: ९,२४५

पुरुष : ११,१८५

३ नानीबाई रुग्णालय

महिला

: ८,१८३

पुरुष

: ११,०६६

एकूण झालेले लसीकरण

पुरुष

कोविशिल्ड : ३६,६३८

कोव्हॅक्सिन : ७,६८०

महिला

कोविशिल्ड : ६,०८४

कोव्हॅक्सिन : ३१,२९५

कोट

न घाबरता लस घ्या

कोरोना प्रतिबंधक लस ही गर्भवती महिला व स्तनदा माता यांच्यासाठी सुरक्षित आहे. त्यांनी न घाबरता आपल्या व बाळाच्या सुरक्षेसाठी ही लस घ्यावी. मनात कुठलीही भीती किंवा शंका न ठेवता लसीकरणाला यावे. यामुळे आपण कोरोनाला आळा घालू शकतो. - डॉ. समाधान वाघ, जिल्हा लसीकरण अधिकारी

कोट

अद्याप गर्भवतींच्या लसीकरणाबाबत आवश्यक माहिती कुठे उपलब्ध नाही. यानंतर होणाऱ्या रिॲक्शनबाबत कल्पना नाही. त्यामुळे थोडी भीती मनात आहेच. म्हणून अद्याप लस घेतलेली नाही. - गर्भवती महिला

कोट

गर्भवती महिलांचे लसीकरण सुरू झाल्याचे समजले आहे. तब्येतीबाबत या दिवसात अधिक काळजी राहतेच, अशा वेळी मनात अनेक संभ्रम व भीती राहते. लसीकरणानंतर रिॲक्शनच एक भीती मनात आहे. - एक गर्भवती महिला

Web Title: Pregnant back to vaccination, no woman has yet been vaccinated at the three centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.